सुभाष पंढरीनाथ गुप्ते यांनाच जन्म ११ डिसेंबर १९२९ रोजी मुंबईमध्ये झाला. सुभाष गुप्ते यांनी पहिला कसोटी सामना ३० डिसेंबर १९५१ रोजी इंग्लंड विरुद्ध खेळला . ते लेगब्रेक गुगली गोलंदाज होते. थोडे आपण आता ‘ गुगली ‘ म्हणजे काय हे बघू.
१८९० च्या सुमारास बोसाकेम्हणजेच ‘ बोझी ‘ नावाच्या मिडलसेक्समधल्या एक गोलंदाजाने लावला त्याचे खरे नाव होते ‘ बेनार्ड जेम्स टिंडल बॉसनक्वेट ‘ त्याला ‘ बोझी ‘ या नावाने संबोधत. बोसाके यांनी टेनिस चेंडूवर प्रयोग करून ‘ गुगली ‘ ची पद्धत शोधून काढली. लेगब्रेकचा अविर्भाव करून ऑफब्रेक टाकता येतो हे या पकडीमुळेच सिद्ध झाले. त्या वेळी ऑस्ट्रियाकडे टेरी जेनर आणि केरी ओक्किफ हे चांगले लेगब्रेक गोलंदाज होते. डग्लस राईट , अमीर इलाही , रिची बेनो यांच्यासारखे कितीतरी लेगब्रेक गोलंदाज होते परंतु सुभाष गुप्ते हे तर सगळ्यामध्ये उत्तम लेगब्रेक गोलंदाज होते जर त्यांना त्यावेळी क्षेत्ररक्षकांनी आधी सहकार्य मिळावयास हवे होते. त्यांना मिळाल्या त्याच्या दुप्पट विकेट्स घेतल्या असत्या. असे अनेकांचे मत होते .
त्यांच्या फसवणाऱ्या गोलंदाजीवर कितीतरी फलंदाज पायचीत झालेले होते. प्रतिस्पर्धी संघाच्या तळाच्या फलंदाजांना ते सहजपणे आपल्या गुगलीने गुंडाळत असत. ते तळाकडच्या फलंदाजांना टिकू देत नसत. ते कधी बचावात्मक किंवा नकारात्मक खेळत नसत . त्यांची ती वृत्तीच नव्हती. ते अत्यंत आक्रमक होते. एकदा का त्यांनी गोलंदाजी सुरु केली की खेळाला कलाटणी ही मिळणारच असे ठरलेले असायचे . १९५० च्या पूर्वी काही वर्षे मुंबई क्रिकेट क्लब ऑफ इंडियाने सुभाष गुप्ते यांना सभासद होण्यासाठी आमंत्रण दिले होते. १९५१ मध्ये सुभाष गुप्ते यांचा खरा ‘ शोध ‘ वेन्स्लेने लावलेला होता. पुण्याला त्यावेळी वेन्स्लेनेच्या देखरेखीखाली शिबीर चालू होते . सुभाष गुप्ते यांची गोलंदाजी बघूनच त्याने सांगून टाकले की हा खेळाडू भारतातर्फे खेळेल आणि नाव कमावेल. १९५२-५३ च्या वेस्ट इंडिजच्या दौऱ्यामध्ये सुभाष गुप्ते यांनी त्या मालिकेमध्ये २७ विकेट्स घेतल्या त्या २९.२२ या सरासरीने.
सुभाष गुप्ते यांच्या लेगब्रेकमुळे नेहमी खेळणारा फलंदाज खऱ्या अर्थाने गोधळत असे. कारण त्याला सुभाष गुप्ते यांच्या गोलंदाजीवर अत्यंत सावध रहावे लागे. त्यांच्या पटकन वळणाऱ्या चेंडूवर आणि त्यांनी दिलेल्या उंचीवर तो फलंदाज बुचकळ्यात पडायचा आणि सुभाष गुप्ते यांचे ‘ गिऱ्हाईक ‘ व्हायचा . ते नेहमी नवीन फलंदाजाच्या जवळ चेंडू टाकून त्याला त्याचा गोधळ उडवायचे , भंडावून सोडायचे.
सुभाष गुप्ते यांची ऐकून तीन दौऱ्यासाठी निवड झाली होती. १९५३ साली ते वेस्ट इंडिजमध्ये गेले होते तेथे त्यांनी मालिकेमध्ये २७ विकेट्स मिळवल्या . पुढे १९५५ मध्ये ते पाकिस्तान टूरवर गेले असताना तिथे त्यांनी त्या क्रिकेट मालिकेमध्ये २१ विकेट्स घेतल्या त्या २२.६१ सरासरीने. त्यानंतर त्यांनी १९५९ मध्ये इंग्लंडच्या दौऱ्यामध्ये ऐकून ९५ विकेट्स उडवल्या त्यातील १७ विकेट्स कसोटी मालिकेमध्ये मिळाल्या. त्याची सरासरी होती ३४.६४ . १२-१७ डिसेंबर १९५८-५९ मध्ये वेस्ट इंडिजचा संघ भारतात आला असताना त्यांनी कानपूरला १०२ धावांमध्ये ९ विकेट्स घेतल्या. कसोटी सामन्यामध्ये एका डावात विरुद्ध संघाच्या ९ विकेट्स घेणारे तेच पहिले गोलंदाज ठरले. पुढे लगेच पुढल्याच वर्षी १९५९-६० मध्ये जसू पटेल यांनी ६९ धावा देऊन ऑस्ट्रेलियाच्या ९ विकेट्स घेतल्या. अनेकांना एका डावात ९ विकेट्स म्हटले की जासू पटेल आठवतात परंतु जवळजवळ १ वर्षांपूर्वीच सुभाष गुप्ते यांनी ९ विकेट्स घेतल्या हे सहसा आठवत नाही . परंतु हा रेकॉर्ड पुढे अनिल कुंबळे यांनी एका डावात १० विकेट्स घेऊन मोडला हे सर्वश्रुत आहेच .
वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर असताना त्यांना त्यांची भावी पत्नी कॅरोल भेटली आणि त्यांनी तिच्याशी लग्न केले. त्यानंतर ते वेस्ट इंडिजला स्थायिक झाले. १९५६ च्या दौऱ्यामध्ये त्याची गोलंदाजी ऑस्ट्रेलियन संघाने फोडून काढली नील हॉर्वेने तर मजबूत ‘ फटकारले ‘. खेळामध्ये चढ उत्तर हे असतातच. सुभाष गुप्ते यांनी शेवटचा कसोटी सामना १३ डिसेंबर १९६१ रोजी इंग्लंडविरुद्ध खेळला .
सुभाष गुप्ते यांनी ३६ कसोटी सामन्यांमध्ये १८३ धावा केल्या आणि १४९ विकेट्स घेतल्या . त्यांनी १२ वेळा एका डावात ५ किंवा ५ पेक्षा जास्त विकेट्स घेतल्या. तर एका डावामध्ये १०२ धावा देऊन ९ विकेट्स घेतल्या . सुभाष गुप्ते यांनी फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये ११५ सामन्यांमध्ये ७६१ धावा केल्या आणि ५३० विकेट्स घेतल्या. त्यांनी ३६ वेळा एका डावात ५ किंवा ५ पेक्षा जास्त विकेट्स घेतल्या तर फर्स्ट क्लास क्रिकेटमध्येच एका डावामध्ये ७८ धावा देऊन १० विकेट्स घेतल्या.
अशा ‘ गुगली ‘ च्या बादशहाचे ‘ फिरंगी ‘ गुप्ते यांचे ३१ मे २००२ रोजी वयाच्या ७२ व्या वर्षी त्रिनिनाद येथे निधन झाले.
— सतीश चाफेकर.
Leave a Reply