किती दिवसात पावसाच्या सरीत चिंब भिजलेच नाही.
रिमझिम रेशीमधारा आणि गोल गारामणी झेललेच नाही…
किती दिवसात पागोळ्यांचे मणी ओंजळीत धरलेच नाही.
आणि पत्र्याच्या तडमताशाचे आवाज ऐकून ताल धरलाच नाही…
किती दिवसात कागदी बोट पाण्यात सोडून दिलीच नाही.
आणि लांबवर जाऊन पाण्यात दूरवर गेलेली पाहिलीच नाही….
किती दिवसात भिजलेले केस कोरडे केलेच नाही.
चुलीपाशी बसून आईच्या हातचा गरम गरम चहा प्यालेच नाही…
किती दिवसात चिखलात घसरून पडलेलीच नाही.
पडल्याने रस्त्यावर झालेली फजितीचे दु:ख पचवलेच नाही…
— सौ कुमुद ढवळेकर.
Leave a Reply