किती रंग या जीवनी पहावे, कितीदा पुन्हा नव्याने जगावे,रोज रोज नवीन ताजे,
दुःख जिवापाड सोसावे,–!!
ठरवलेले नेहमी चुकते,
विपरीत काही घडते,
अगणित अपेक्षांचे ओझे,
इवल्या हृदयाने पेलावे,-?
जे विधायक, ते दूर राहते,
नकारात्मक ते सारे घडते,
आपल्याच जिवाचा बळी
रोज नव्याने पहावे लागते,-!!
मदतीचा हात करता पुढे,
आरोपांना पेंव फुटते ,
आंधळ्या निर्जन आयुष्याला ,
रानावनीची वाट दिसते,–!!
कुणाला आपले म्हणावे,
मन एक ठरवून ठेवते,
बघता बघताअगदी सारे,
कुठेतरी बिनसलेले असते,–!!!
गैरसमजांची तुफान वादळे,
अवती भोवती घोंघावती ,
अलगद घास टिपण्या,
सभोवार तांडव करिती,-!!
शांतता करुणा प्रेम
सहकाराच्या सर्व भावना,
का हरत राहती सारख्या,–
मग जीवन कसे असावे क्षेम,-?
हिमगौरी कर्वे.©
Leave a Reply