कुणी असे कोणी तसे,
कित्येक काही ठरवतात,
मध्येच काय मग बिनसते,
सगळेच डाव मोडतात,–!!!
कोण येते आणिक आपुली,
जादू करुनी जाते,–
नाम तिचे असते नियती,
नियत ते परास्त करते,–!!!
ठरवून गोष्टी बिघडती,
आकस्मिक बसतात धक्के,
एकदम मग कोण कसे,
माणसास कळून चुके, –!!!
राजकारण,अनीतीअन्याय,
किती गोष्टींचे आपण बळी,
सत्तालोलूप मदांधांमुळे,
जनता चिरडली जाई खरी,–!!!
पैसा एक मुख्य कारण,
नाती सडती त्यामुळे,
प्रेमातही कठोर व्यवहार,
केला जातो त्या कारणे,–!!!
नियती गालात हसते,–
जेव्हा सुख एखादे पदरी,
थोडे थांब ती म्हणते, –
दाखवते तुज किमया सारी,-!!!
– व्यक्तिगत, सामाजिक,
आर्थिक अशी किती संकटे, मनुष्यमात्र तिच्यापुढे भोगी,
करत करत सारखी दुष्कर्मे,—!!!
अहंता, स्वार्थ, भांडणे,
किती तिचे सेवक असती, बघता-बघता ताबा घेऊन,
तुम्हाला लोळवून टाकती,–!!!
प्रेम, माया, जिव्हाळा, आपुलकी ज्यांना कधीच कळत नाही,
नियती तिथे फासे टाकी,
कोपर्यात बसून गंमतपाही–!!!
हिमगौरी कर्वे.©
Leave a Reply