दोघांनी रजिस्टर पद्धतीने लग्नाचा सोहळा आईच्या उपस्थीती विना पार पाडला आणी मिया बीबींचा संसार सुरु झाला, आईला मन घट्ट करत स्वताला सावरावेच लागले. बिपीन एकलकोंडा, हातात भरपूर पैसा, मनमानी जीवन जगणारा, स्वताच्या हुशारीचा पराकोटीचा अभिमान, बोलण्यात फटकळ, मी म्हणेन तेच खरे, अहंकारात डूबलेला, पण आंधळ्या प्रेमापुढे इतर सर्व गोष्टीना थाराच नसतो. संगीताच्या संसारात रोजचा दिवस नवीन सुखाने उजाडत होता.
संगीताला प्रमोशन मिळाल्याबद्दल तीने बॅंकेत एक छोटी पार्टी ठेवली होती, ‘बिपीन आज सन्ध्याकाळी तू नक्की यायचे आहेस. संगीता नटून थटून गेली होती. बिपीन ने काहीतरी सुल्ल्क कारण पुढे करत गेलाच नव्हता. रात्री ११ वाजता हातात गुलाबाचा सुंदर गुच्छ इतकी आनंदात घरी आली, पण गुर्मीतच त्याने दार उघडले, न बोलता सरळ बेडरूम मध्ये गेला, संगीता लाडात त्याच्याशी बोलत होती, तिनेच पुधाक्र घेत त्याला मिठीत घेण्याचा प्रयत्न केला, ’तुला आज माझे झालेले कौतुक ऐकून घ्यावेच लागेल हं असे म्हणत म्हणत तीने त्याचा मुकाही घेतला, पण थंड प्रतिसाद देत मिठीतून सुटका करून चक्क दुसऱ्या खोलीत झोपावयास गेला, ‘तुझे प्रमोशन तुझ्या जवळच ठेव, अहंकाराचा दर्प उफाळलेला होता.
संगीता अंधारात मुसमुसत पडली होती, नाना विचारांनी डोके भणभणत होते, आपल्या आनंदात बिपीन सहभागी नसेल तर काय अर्थ ? स्वभावाचे पैलू लग्नानंतरच कळतात, ही तर सुरवातच होती. विचारांच्या गुंत्यात पहाटेला डोळा लागला, उठण्यास उशीर झाला, स्वताचा चहा करून स्वारी ऑफीसला निघून गेली होती. संगीताने आपल्या प्रेमळ समंजस वागण्याने राजा राणीचा संसार रुळावर आणला होता.
— डॉ. अविनाश वैद्य.
Leave a Reply