नवीन लेखन...

स्त्रियांनो… आरोग्याकडे लक्ष द्या

Ladies should take care of health

आयुर्वेदाचा उगमच मुळी आपल्या स्वैपाकघरातुन झाला. आणि त्यागाची मुर्ती म्हणुन जिच्याकडे पाहिले जाते ती स्त्रीच्या हातात स्वतः तिचे, तिच्या घरातील माणसांचे आणि अप्रत्यक्षरीत्या ती वावरत असलेल्या समाजाचे भवितव्य अवलंबून असते. जर एखादया स्त्रीनेच जर घरातील माणसांचे आरोग्य सुधारायचे ठरवले तर त्यासाठी पहिल्यांदा तिला स्वतःमध्ये जाणीवपूर्वक बदल हे करायलाच हवेत. (शिळे अन्न न खाणे, सर्वानसोबत आपणपण सकाळ- संध्याकाळी लवकर जेवण घेणे वगैरे वगैरे) दुसर्‍यांना पक्वान्न करुन घालेल, स्वतः मात्र शिळे अन्न खाऊन किंवा प्रसंगी उपाशी राहील. ही वृत्ती आता नको.आपल्याबरोबर आपल्या कुटुंबाला,समाजाला सुदृढ करावयाचे असेल तर प्रथम स्वतःमध्ये ते बदल करुन कृतीत आणणे तितकेच गरजेचे आहे.

त्याचबरोबर स्वतःच्या आरोग्याच्या दृष्टीने आहार,विहार व विचार हेपण महत्वाचे आहेत.
निर्माण झालेली प्रत्येक गोष्ट ही पूर्णत्वाला पोहचते आणि लयाला जाते हा निसर्गाचा नियमच आहे हे लक्षात घेणे तितकेच गरजेचे आहे.

आज धावपळीच्या जगात ,पुरूषाच्या खांदयाला खांदा लावून समाजात वावरताना तीने स्वतःच्या आरोग्याकडेपण तितक्याच काळजीने पाहिले पाहिजे. हया ठराविक दिवसात (पाळीच्या वेळी) तिला खुप त्रास होत असतो,एकप्रकारचा थकवा येतो.त्यासाठी हया दिवसातील आपल्या कामाचे नियोजन जाणीवपूर्वक करणे गरजेचे आहे.जमत असेल तर (office च्या नियमांना धरुन/वरिष्ठांशी बोलून)त्या ठराविक दिवशी कामाच्या बाबतीत सवलती घेणे ,रजा घेणे.(आज परदेशातपण काही देशात हया ठराविक दिवशी स्त्रिला हक्काची तिच्या रजा दिली जाते. जेणेकरुन त्या दिवसातील येणारा थकवा कमी होईल.हेच घरातील कामांच्या बाबतीतपण करणे तेवढेच गरजेचे आहे .नाहीतर घरी राहुन घरातील पसारा आवरुया,हे नको.

जिन्स घातल्याने एकप्रकारचा ताण येतो,office चा ड्रेसकोड जरी असला तरी सुट्टीच्या दिवशी सहसा असा पेहराव टाळावा. एकप्रकारचा ताण येतो. आज्ञ्याचक्राच्या (भुवयांच्या मधोमध) हार्मोन्समध्ये बदल होत असतात,पिट्युटरी ग्रंथी येथुनच गेलेली असते,इथे परमेश्वराचा वास असतो असेपण म्हणतात,पुरुषांनी हया ठिकाणी नेहमी अष्टगंध व बायकांनी कुंकु जरुर लावावे.दिवसभर मनात भक्तिभाव व शांती नांदते,हे करुन पहिल्याशिवाय अनुभवता येत नाही.हवा कधी आपण पहातो का?? नाही ना !!!पण हवा म्हणजे काय असते हे नक्की अनुभवू शकतो.चला हवा येऊ दयाSsssss

गर्भाशय,असा एकमेव अवयव जो फक्त स्त्रियांच्या शरीरातच असतो आणि हयांच्याशीच संबधित अर्धेअधिक आजार हे तिला होताना दिसतात.

आपल्या office चा ड्रेसकोड जरी शर्टपॅन्ट असले तरीही सुट्टीच्या दिवशी हा पेहराव नको.एकृप्रकारचा ताण येतो.

पायांच्या बोटात जोडवी घालावी-हयाचा संबध गर्भाशयाशी संबधित आजार कमी होण्यास मदत करतात,हातात बांगडया,गळयात मंगळसुत्र घालावे.मंगळसुत्राची लांबी लहान अर्थात आपल्या ह्रुदयापाशी असावे.खुप चांगले अनुभव येतात,हयामधील दोन वाटया हया एका अर्थाने जरी सासर-माहेर जोडणा-या असल्या तरी हया पोकळ वाटीत ती विवाहिता आपल्या सुखदुःखाच्या गोष्टी साठवून इकडचे तिकडे न करता दोन्ही घरात आनंदाचे वातावरण निर्माण करते.(नाहीतर चुगलेगिरी करुन दोन्ही कुंटुबात कृलह निर्माण होतील.मानसिक स्थैर्य नाहीसे होऊन आजारांना आमंत्रण मिळेल)

अशा कितीतरी गोष्टी दैनंदिन जिवनात पहावयास मिळतात.

एका स्रिला जर अशी एखादी गोष्ट पटली तरच ती आपल्या कुटुंबातील माणसांना सुधारु शकते (दिनचर्या,ऋतुचर्या,परिचर्या…),कुटुंबातील सदस्यांनी बदल स्विकारले,आंगिकारले की समाज बदलायला काही वेळ लागत नाही आणि समाज बदलला की…..गाव बदलेल…देश बदलेल…..जग बदलेल.

जे सुंदर शरीर आपल्याला परमेश्वरांने दिले आहे ते आणखीनच सुदृढ बनविण्याचा प्रयत्न माझ्या सर्वच सुंदर सख्यानी नको का करायला??

अहो पहाताय काय असे?चला तर मग लागा कामाला…..प्रथम बदल घडवा आपल्या स्वःतःमध्ये……. नंतर आपल्या कुटुंबामध्ये … समाजामध्ये……..

सौ.कल्पना हडकर.
आपलीच प्रियसखी….

आरोग्यदूत या WhatsApp ग्रुपच्या सौजन्याने

Avatar
About आरोग्यदूत व्हॉटसअॅप ग्रुप 118 Articles
आरोग्यदूत हा वैद्य सुविनय दामले यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्यविषयक बहुमोल माहितीची देवाणघेवाण करणारा एक अतिशय लोकप्रिय व्हॉटसअॅप ग्रुप आहे. या ग्रुपवरील निवडक पोस्ट वाचकांच्या सोयीसाठीप प्रकाशित करत आहोत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..