नवीन लेखन...

जेष्ठ मराठी गायिका ललिता देऊळगावकर फडके

Lalita Phadke

ललिता फडके या पूर्वाश्रमीच्या त्या ललिता देऊळगावकर. ललितापंचमीच्या दिवशीचा त्यांचा जन्म. वडील कापडाचे व्यापारी. त्यांचे दोन काका उत्तम गाणारे होते आणि आजीचाही आवाज गोड, त्यामुळे त्यांच्याच प्रेरणेने ललिता गाणं शिकल्या. पण गाणं हे घरापुरतं ठेवायचं, हा त्या काळातल्या सर्वसाधारण मंडळींचा दृष्टिकोन. त्यामुळेच शेजारच्या बंगाली कुटुंबाकडे आलेले कवी आणि अभिनेते हरिंद्रनाथ चट्टोपाध्याय यांनी या मुलीचा आवाज ऐकला तेव्हा ‘हिला तुम्ही सिनेमात का पाठवत नाही ?’ असा प्रश्‍न केला. देऊळकर खरं तर या गोष्टीला राजी नव्हते. मात्र त्यांनी अखेर ती तयारी दर्शविली. ललिताबाईंनी गायनाचे धडे दत्तोबा तायडे आणि पुरुषोत्तम वालावलकर यांच्याकडे गिरवले. शास्त्रीय संगीतही त्या उत्तम गायच्या.

चट्टोपाध्याय यांच्याच ओळखीने ललिताबाईंना ‘बॉम्बे टॉकीज’या मातब्बर संस्थेत प्रवेश मिळाला. ‘बॉम्बे टॉकीज’ची आघाडीची नायिका देविकाराणी सोबत ‘दुर्गा’ मध्ये एक फुटकळ भूमिका त्यांनी केली. याच संस्थेच्या ‘अंगूठी’मध्ये त्या दोन गाणीही गायल्या. ‘बंधन’, ‘कंगन’ या चित्रपटांपर्यंत त्या ‘बॉम्बे टॉकीज’ मध्ये होत्या.

१९४० च्या दशकाच्या अखेरीस खर्‍या अर्थानं पार्श्‍वगायनाचं युग आलं. याच काळात सी. रामचंद्र यांनी ललिताबाईंच्या आवाजाचा कल्पकतेनं वापर करुन घेतला. त्यांचं संगीत असलेल्या “साजन” मधलं ‘हमको तुम्हारा ही आसरा’ हे ललिताबाईंनी मोहम्मद रफीसोबत गायलेलं गाणं चांगलंच गाजलं. पण कहर केला तो सी. रामचंद्र यांच्याच “नदिया के पार” मधल्या ‘मोरे राजा हो… ले चल नदिया के पार’ या ललिता आणि रफी यांच्या युगुलगीतानं ! बडे संगीतकार मास्टर गुलाम हैदर यांनीही ‘शहीद’ साठी ललिताबाईंकडून दोन गाणी गाऊन घेतली. त्यातलं ‘कदम उठाकर रुक नहीं सकता’ हे समरगीत आजही आठवणीत असणार.

याच काळात मराठीतले उगवते संगीतकार मा.सुधीर फडके यांच्यासाठीही त्या गायल्या आणि पुढे त्यांच्याशी विवाहबध्द झाल्या. २९ मे १९४९ रोजी झालेल्या त्या विवाह सोहळ्यात खुद्द मोहम्मद रफीनं मंगलाष्टकं म्हटली होती, हाही एक दुर्लभ योग ! मराठीतही त्यांनी आपल्या आवाजाचा ठसा उमटवला. जशास तसे, मायबहिणी, उमज पडेल तर, वंशाचा दिवा, जन्माची गाठ, माझं घर माझी माणसं, रानपाखरं, चिमण्यांची शाळा, प्रतापगड इत्यादी चित्रपटांसाठी त्यांनी पार्श्वगायन केलं.

आशा भोसले यांना सर्वप्रथम ललिताबाईंना पारखलं होते. त्यांनीच बाबूजींकडे आशाबाईंचे नाव सुचवले होते.
पुणे आकाशवाणीवर सर्वप्रथम सादर झालेल्या ‘गीतरामायण’ मधली गीतरामायणातील कौसल्येची सर्व गाणी ललिताबाईंनी गायली आहेत. सुधीर फडके यांच्या व्यक्तिमत्त्वाला सामाजिक आणि राजकीय पैलूही होते. त्यातील सर्व टप्प्यांवर बाबूजींना खंबीर साथ मिळाली ती ललिताबाईंची, म्हणूनच ‘गदिमा प्रतिष्ठान’तर्फे काही वर्षांपूर्वी ललिताबाईंना लाभलेला ‘गृहिणी-सखी-सचिव’ पुरस्कार त्यांच्या कर्तृत्वाचा मान राखणाराच ठरला. ‘ललिताने घराकडे पूर्णपणे लक्ष दिल्यामुळेच मी एवढे यश मिळवू शकलो’, असं अभिमानानं सुधीर फडके सांगत.ललीता फडके यांचे निधन २५ मे २०१० रोजी झाले.

संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट /मराठी सृष्टी.कॉम

ललीता फडके यांची काही गाणी :
मोठं मोठं डोळं तुझं (जशास तसे)
रंगू बाजारला जाते हो, जाऊद्या (वंशाचा दिवा)
पाव्हणं एवढं ऐका (वंशाचा दिवा)
नखानखांवर रंग भरा (मायाबाजार)
मी तर प्रेम दिवाणी (सुवासिनी)
लंगडा गं बाई लंगडा नंदाचा कान्हा लंगडा (सौभाग्य)
मिटून घेतले नेत्र तरी (उमज पडेल तर)
तिन्ही सांज होता तुझी याद येते (चिमण्यांची शाळा)
मी आज पाहिला बाई (चिमण्यांची शाळा)
रंगूबाई, गंगूबाई हात जरा चालू द्या (चिमण्यांची शाळा)
अळीमिळी गोम चिळी (माय बहिणी)
उगा का काळीज माझे उले पाहूनि वेलीवरची फुले (गीत रामायण)
सावळा गं रामचंद (गीत रामायण)
नको रे जाऊ रामराया (गीत रामायण)

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4354 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..