ह्याचे मोठे प्रसरणशील काटेरी गुल्म असते.खोड व फांद्यावर काटे असतात.पाने ३ सेंमी लांब पक्षाकार असून फुले फिकट पिवळ्या रंगाची मंजिरी स्वरूप असतात.खालचे फूल फळात रूपांतरित होते.फळ ६ सेंमी लांब,चपटे,काटेरी व आत १-२ बिया ज्याला आपण सागर गोटा म्हणतो त्या असतात.बिया गोलाकार,निळसर करड्या व कठिण आवरण असलेल्या असतात.
ह्याचे उपयुक्तांग बीज असून ते चवीला तिखट,कडू,तुरट असून उष्ण गुणाचे व हल्के व रूक्ष असते.लताकरंज कफ व वातनाशक आहे.
चला आता आपण ह्याचे औषधी उपयोग जाणून घेऊयात:
१)आमवात व संधिवात ह्यात लताकरंज तेल चोळल्यास फायदा होतो.
२)सागरगोट्याच्या बियाची साल तुरट असल्याने जुलाब,आव पडणे ह्यात उपयुक्त आहे.
३)सुजेवर सागर गोटा,रूई,एरंडाची पाने एकत्र वाटून गरम करून लेप करतात.
४)सागरगोटा चुर्ण ओव्या सोबत दिल्यास मासिक पाळी नियमीत येण्यास मदत होते.
५)जखमेवर सागरगोटा पाण्यात उगाळून त्याचा लेप लावावा.
(सुचना: ह्या लेखातील वनस्पती वैद्यांचा सल्ला घेऊनच वापरावे )
(कृपया फोटो चुकला असल्यास सांगावे हि विनंती)
वैद्य(सौ)स्वाती हेमंत अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लिनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:९९६०६९९७०४
©️Dr Swati Anvekar
सागरगोट्याचा मधुमेही रुग्णांना काही उपाय होऊ शकतो का?
सागर गोट्याची रोप तयार करायची असल्यास त्यावर काही विशिष्ट संस्कार करायचे असतात काय?
करायचे असतात तर ते कोणते कृपया सविस्तर माहिती देण्यात यावी ही विनंती…
– वसंत विठ्ठलराव भिसेकर, पुणे,
मो.क्र. 9822006291
Give me sagargotha tail
hi, lahan mulanna 14 mahinyachya balala lavkar bolta yave mhanun he uglun deu shakto ka?
सागरगोटे+काळीमिरी भाजून त्याची पावडर कोरोना विषाणू वर औषध ठरु शकते का??? मलेरिया वर हे काम करत हा काही लोकांचा अनुभव आहे.
sagar gotya pasun kahi saidefect tar nahina
पुण्यात येणार का आणि मानधन किती घेता
nahi me punyat yet nahi phakt govyat practice karate
नाही पोटाच्या विकारात हे वापरतां येत नाही
Khup Chhan mahiti Aahe… Bt Mala ajun Thodi information havi aahe….pota chya vikar sathi fayade karak aahe ka??? Acidity.. Ajirna vagare… Please reply