नवीन लेखन...

“गटारी” अमावस्या म्हणजे आपली “दीप अमावस्या”

येत्या २३ तारखेला असलेली “गटारी” अमावस्या म्हणजे मुळातील आपली “दीप अमावस्या”…

शुभं करोति कल्याणम् आरोग्यं धनसंपदा |
शत्रुबुद्धि विनाशाय दीपत्ज्योति नमोस्तुते ||
पंचमहाभूतांमधील एक म्हणजे – अग्नी देव … त्याचेच रूप म्हणजे आपला दिवा.
दिव्याचे स्थान आपल्या घरोघरी देवघरात तर आहेच पण प्रत्येक शुभ कार्यात आपण तेलाचा आणि तुपाचा असा दिवा जरूर लावतो. आपण केलेले एखादे कर्म ह्याची साक्ष म्हणजे दिवा असतो असे आपल्या शास्त्रात म्हणले आहे. कितीही Tubelights आल्या, विविध प्रकारचे इलेक्ट्रिक दिवे आले तरी जी शांती आणि समाधान आपल्याला समईच्या ज्योतीकडे पाहून मिळते ते असंख्य इलेक्ट्रिक रोषणाईने सुद्धा मिळत नाही.
ह्या दिवशी दीप पूजन कसे करावे? 
आपल्या घरातील, काना कोपऱ्यातील, कपाटातील चांदीचे, पितळेचे दिवे घासून पुसून स्वच्छ करायचे. संध्याकाळी दिवेलागणीला ह्या सर्व दिव्यांची पूजा करायची. रांगोळी काढायची. पाटावर दिवे मांडून त्यांना गंध, फूल आणि अक्षता वाहायच्या. नमस्कार करायचा. गोडाचा नैवेद्य दाखवायचा. नैवेद्याला कणकेचे गोडाचे दिवे ठेवण्याची खरी प्रथा आहे. पण जमले नाही तर कुठलाही गोडाचा नैवेद्य दाखवायचा.पाटावर ठेविलेल्या दिव्यांची आरती करायची. दिव्यांची प्रार्थना करायची. “आमच्या जीवनातील, मनातील, बुद्धीतील सर्व अंधःकार नष्ट होउदे. जसा दिवा इतरांचे आयुष्य प्रकाशमान करतो तसेच आमच्या हातून सुद्धा देशासाठी, समाजासाठी काहीतरी हिताचे होउदे.”
आपल्याकडे प्रत्येक प्रथेमागे, सणामागे काही ना काही सामाजिक आणि शास्त्रीय कारणे ही आहेतच. दीप अमावास्येच्या दुसऱ्या दिवशीपासून महाराष्ट्रात श्रावण सुरु होतो. ऊन-पावसाचा खेळ. अंधार देखील लवकर पडू लागतो. कदाचित म्हणूनच पूर्वी दीप अमावास्येच्या निमित्ताने घरातील सर्व दिवे बाहेर काढून त्या योगे त्यांची स्वच्छता व्हावी असे अध्यारूत असावे.
ह्या वर्षी अनायासे रविवारी आलेली दीप अमावस्या आपण पारंपरिक पद्धतीने अगदी सहजपणे साजरी करूयात आणि येणाऱ्या श्रावण मासाचे स्वागत करूयात…
मृदुला बर्वे
डायरेक्टर, 
www.oPandit.com

मृदुला बर्वे
About मृदुला बर्वे 1 Article
"मुंबई मध्ये राहत असून शिक्षणाने computer engineer आहे. 8 वर्षे analytics field मध्ये नोकरी केल्यानंतर स्वतःची www.oPandit.com अशी पौरोहित्य विषयात संपूर्ण operations असणारी संस्था चालू केली आहे. आधी मुंबई आणि आता पुणे आणि नाशिक मध्ये संस्थेचे काम सुरू झाले आहे.   अधिक माहितीसाठी क्लिक करा
Contact: Facebook

1 Comment on “गटारी” अमावस्या म्हणजे आपली “दीप अमावस्या”

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..