गरम पाण्याच्या कुंडासाठी प्रसिद्ध असलेले मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील “आरवली” हे गाव!!! मुंबईहुन गोव्याकडे जाताना चिपळुण हुन सुमारे ३१ किमी तर संगमेश्वर च्या अगोदर १६ किमी वर लागणारे आरवली गावाची २००८-२००९ नंतर नवीन ओळख तयार झाली…. गरम पाण्याच्या कुंडात अंघोळ केल्यावर अंगावरची रोगराई पळुन जाते अस म्हणतात…. एका अर्थाने गावाची तीच परंपरा, तीच ओळख कायम ठेवणारा एक “मोदक” या गावात जन्माला आला…. आता गरम पाण्यात अंघोळ न करता आपल्या अजोड सुरेल गळ्यांने सुरांची बरसात करुन रसिकांना न्हाऊ घालणारा प्रथमेश उमेश लघाटे याच गावात २९ सप्टेंबर १९९४ साली जन्माला आला…..!!
सुमारे तीन हजार लोकवस्तीच्या या गावात पुर्वी मनोरंजनाची कोणतीही साधने ऊपलब्ध नव्हती…. तेंव्हा या गावातील ब्राह्मण वाडीतील ३०/३५ घरातील मंडळी रात्री गप्पा मारणे, पत्ते खेळण्यासाठी एकत्र जमा व्हायचे. या एकत्र येण्यातुनच कै. विष्णू विनायक लघाटे यांनी भजनाची संकल्पना मांडली…. आणि दर गुरुवारची भजन परंपरा सुरु झाली. साल होते १९२५!!! आजपर्यंत हि परंपरा यशस्वीपणे सुरु आहे. ह्या भजन परंपरेतुनच महाराष्ट्राला एक ऊमदा गायक मिळेल ह्याची ह्या भजनी मंडळींना स्वप्नात देखील कल्पना आली नसेल. ह्या परंपरेतुन प्रथमेशला बालपणीच गायनाची गोडी लागली. प्रथमेशच्या घरच्यांनी मग त्याच्या गायनाची आवड लक्षात घेऊन त्याला श्री सतिश कुंटे यांच्याकडे गायन वर्गासाठी पाठवले. प्रथमेशचा कल शास्त्रीय गायनाकडे होताच. त्यामुळे त्याला शिक्षण घेताना फार अडथळे आले नाहीत. पुढे २००८/०९ साली झी मराठी ह्या वाहिनीवर “सारेगमप” ची घोषणा झाली… आणि प्रथमेश पाय आपोआप तिकडे वळले…. त्यांने पहिल्या भागापासुनच आपलं स्वत:च असं एक वेगळं स्थान निर्माण केलं.
बाबुजी आणि गदिमांचे गीतरामायण पुर्वी घरी थांबुन रेडिओ ला कान लाऊन ऐकायचे, पुढे दुरदर्शनच्या काळात रामायण, महाभारत या मालिकांच्या वेळेत रस्ते निर्मनुष्य असायचे…. झी सारेगमप (लिटल चॅम्प्स) च्या वेळी हा अनुभव पुन्हा आला….. यात सिंहाचा वाटा होता तो प्रथमेशचा!!! तोच या पर्वाचा विजेता ठरेल अशी रसिक वर्गाला अपेक्षा होती… निकाल मात्र वेगळाच लागला(त्याचा इतिहास सर्वश्रुत आहेच) परंतु रसिकांची मनं जिंकुन खरा विजेता ठरला तो प्रथमेशच!!!
आपल्या गावावर निस्सिम प्रेम करणारा प्रथमेश सध्या पुण्यात राहुन संगीत विषयात MA करतोय. मात्र त्याची गावची ओढ, गावावरचं प्रेम अजिबात कमी झालेलं नाही. तो गावात असेल त्या दिवशी योगायोगाने गुरुवार असेल तर तो भजनाला हमखास हजर असतो.
प्रथमेशचा गळा हि त्यालाच नव्हे तर महाराष्ट्राला परमेश्वराकडुन मिळालेली एक विलक्षण भेट आहे. या गळ्यातून सुरांची अखंड बरसात होत राहो. प्रथमेशला अमाप यश, किर्ती, सन्मान मिळो हिच आजच्या शुभदिनी परमेशाकडे प्रार्थना!!!
WhatsApp वरील संगीत संगीत व फक्त संगीत या ग्रुपवरुन..
Leave a Reply