नवीन लेखन...

लोकप्रिय अभिनेते आणि तमिळनाडूचे दिवंगत मुख्यमंत्री एम.जी. रामचंद्रन

तमिळ चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते आणि तमिळनाडूचे दिवंगत मुख्यमंत्री एम.जी. रामचंद्रन यांचा जन्म १७ जानेवारी १९१७ रोजी झाला. मरुदुर गोपालन रामचंद्रन, ऊर्फ एम.जी. रामचंद्रन किंवा एमजीआर, यांनी अखिल भारतीय अण्णा द्रविड मुन्नेट्र कळघम या राजकीय पक्षाची स्थापना केली. १९७७ ते १९८७ या काळात यांनी तमिळनाडूच्या मुख्यमंत्रिपदाची सूत्रे सांभाळली. हे सलग तीन मुदतींसाठी मुख्यमंत्री होते. तरुणपणी एम.जी. रामचंद्रन आणि त्यांचा भाऊ एम.जी. चक्रपाणी हे दोघे कुटुंबाचा चरितार्थ चालवण्यासाठी नाटकमंडळ्यांमधून कामे करत असत. याच काळात ते गांधींच्या प्रभावामुळे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षात सामील झाले. १९३६ साली सती लीलावती नावाच्या तमिळ चित्रपटात मिळालेल्या एका साहाय्यक भूमिकेद्वारे चित्रपटसृष्टीत त्यांचा प्रवेश झाला. १९४० च्या दशकात त्यांना चित्रपटांमध्ये प्रमुख भूमिका मिळू लागल्या. पुढील तीन दशके तमिळ चित्रपटसृष्टीत त्यांच्या नावाचा दबदबा राहिला. दाक्षिणात्य लोक अभिनेत्यांच्या मागे आणि अभिनेत्रीच्या मागे मोठय़ा प्रमाणात असतात. एम.जी.आर. यांनी याच पद्धतीने अधिराज्य गाजवले होते.

तमिळ चित्रपटांतील हीरोनंतर राजकारणातील तामिळनाडूचे हीरो झाले. तीच गोष्ट एम.जी.आर. यांची. तामिळी चित्रपटांतील शिवाजी गणेशन आणि एम. जी. आर. यांचा काळ होता. चित्रपटसृष्टी गाजवून एम. जी. आर डी.एम.के पक्षाचे ते सदस्य झाले. त्यावेळी आणि त्यावेळचे डी.एम.के.चे नेते अण्णा दुराई हे असे तामिळनाडूचे त्या काळातील सर्वश्रेष्ठ आणि सर्वप्रिय नेते होते. पक्षांतर्गत उतरंडीत झपाट्याने वाटचाल करत ते अल्पावधीतच पक्षाच्या सर्वोच्च वर्तुळात गणले जाऊ लागले. अण्णा दुराईंनी १९६७ साली डी.एम.के.च्या हातात म्हणजे एका प्रादेशिक पक्षाच्या हातातून सत्ता मिळवली आणि तामिळनाडूच्या जनतेवर डी. एम. के.ने अधिराज्य गाजवले. अण्णा दुराई असेपर्यंत द्रमुक अखंड होता. १९७२ साली द्रमुक सोडून त्यांनी स्वतःचा अण्णा द्रविड मुन्नेट्र कळघम पक्ष स्थापला. चित्रपटांतील नायक म्हणून लाभलेल्या प्रचंड लोकप्रियतेचा वापर करून त्यांना राजकारणासाठीही मोठा जनाधार गोळा करता आला. १९७७ साली ते पहिल्यांदा तमिळनाडूचे मुख्यमंत्री बनले. भारतात कोणाही चित्रपट-अभिनेत्याने एखाद्या राज्याचे मुख्यमंत्रिपद मिळवण्याची ही पहिलीच घटना होती. १९८७ साली निधन होईपर्यंत ते मुख्यमंत्रिपदावर होते. एम.जी. रामचंद्रन यांना मरणोत्तर भारतरत्नध पुरस्काराने गौरवण्यात आले होते. जयललिता यांनी एम. जी. रामचंद्रन यांचे बोट धरून राजकारणात प्रवेश केला खरा आणि चित्रपटसृष्टीतल्या राज्यसभेत जाणा-या त्या पहिल्या खासदार होत्या. १९८२ ते ८६ या काळात एम. जी. आर. असताना त्यांनीच त्यांना राज्यसभेत पाठवले आणि १९९१ साली थेट मुख्यमंत्रीपदी त्या आल्या.

एम. जी. रामचंद्रन यांच्या मृत्यूनंतर १९९१ साली जयललिता मुख्यमंत्री झाल्या. एम.जी. रामचंद्रन यांचे २४ डिसेंबर १९८७ रोजी निधन झाले. एम. जी. आर. यांच्या मृत्यूनंतर जी अंत्ययात्रा निघाली तशी अंत्ययात्रा जगाच्या पाठीवर अजून तरी कुठे निघालेली नाही, असे दाखले त्या काळी दिले जात असत.

संजीव वेलणकर पुणे.
९३२२४०१७३३
संदर्भ. इंटरनेट

 पूजा
poojapradhan323@gmail.com
संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4354 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..