माहीत आहे,
तू आभाळाएवढा,
असीम अथांग अपार,
तुझ्या कार्यकर्तृत्वाला,
खरंच नाही सुमार,–!!!
माहीत आहे,
तू विस्तीर्ण सागरासारखा,
प्रचंड उफाळत उसळत
भरतीची वेळ येता,
बेपर्वा बेलगाम बेदरकार,–!!!
माहीत आहे,
तू शांत झऱ्यासारखा,
कलंदर, मितभाषी राहत
आपल्याच धुंदीत राहणारा
फक्त झुळुझुळू वाहत–!!!
माहीत आहे,
तू अजस्त्र ढगासारखा सगळीकडेच विचरत,
संकटात कोणी असता,
निरपेक्ष हात देत,–!!!
माहीत आहे,
तू एखाद्या वटवृक्षासारखा,
स्वतः उन्हामध्ये तापत,
इतरांची सावली होणारा,
थंडी वारे पावसात,–!!!
माहीत आहे,
तू टेकडीसारखा,
संकटांशी सतत झुंजत,
वाऱ्यावादळांतही कायम उभा रात्रंदिन तिन्हीत्रिकाळांत,–!!!
माहीत आहे,
तू भणभणत्या ज्योतीसारखा, स्वतः अगदी जळत जळत,
इतरांना उजेड देणारा,
मश्गुल आत्मसमर्पणांत,
माहीत आहे,
तू घोंघावणाऱ्या वादळांसारखा, सर्वांना भेदरून टाकत ,
सगळ्यांना थरकापवणारा,
फक्त आपुले काम करत,–!!!
हिमगौरी कर्वे.©
Leave a Reply