दोन ग्रंथ ते अप्रतीम बनले, ह्या जगावरती
रामायण महाभारत ह्याहूनी, श्रेष्ठ काही नसती…..१,
धन्य जहाले वाल्मिकी व्यास, ज्यांनी ग्रंथ लिहीले
मानवातील विविधतेचे, दर्शन ते घडविले….२,
विश्वामधला प्रत्येक विषय, हाताळला दोघांनी
शोधून काढण्या काही, निराळे समर्थ नाही कुणी….३,
आद्य कवी वा लेखक म्हणूनी, मान तयांना आहे
अनुकरण ते त्यांचे करिता, पुष्प तयांना वाहे….४
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
Leave a Reply