मला एक प्रश्न पडलाय…..उत्तर सापडलं, माझ्या पुरतं पटलं देखील……तरी पण एकदा तुमचंही मत घ्यावं म्हणून तुम्हालाही विचारतो..
“महाराष्ट्राचं दैवत.. प्रौढ प्रताप पुरंदर.. क्षत्रिय कुलावतंस.. सिंहासनाधीश्वर..
गो ब्राम्हण प्रति पालक.. राजाधीराज ‘छत्रपती’ शिवाजी महाराज” यांच्या उपाधीतील ‘छत्रपती’ हा शब्द, ‘छत्रपती’ की ‘क्षेत्रपती’..?”
‘क्षेत्र’ म्हणजे एखादा मोठा, विस्तृत प्रदेश आणि त्याचा अधिपती, राजा ‘क्षेत्रपती’ असणं योग्य की ‘छत्रपती’?
आजही आपण एखाद्या बड्या व महत्वाच्या देवस्थानचा उल्लेख करताना ‘श्री क्षेत्र’ अशाच शब्द वापरतो. उदा. श्री क्षेत्र तुळजापूर किंवा श्री क्षेत्र महालक्ष्मी इ…
या न्यायाने शिवाजी महाराज ‘श्री क्षेत्र महाराष्ट्राचं’ आराध्य दैवतच आहे..मग आपलं हे आराध्य दैवत ‘क्षेत्रपती’ असणं जास्त योग्य होणार नाही का?
महाराष्ट्रच कशाला, अलम हिन्दुस्थाननर वेगवेगळ्या मुसलमान सल्तनती, पातशाह्या जुलमानं राज्य करत असताना, त्याना नडलेल्या, पुरून उरलेल्या व हिन्दुस्थानची ‘सुंता’ होण्यापासून वाचवलेल्या हिन्दूस्थान क्षेत्राच्या या अनभिषिक्त सम्राटावा उल्लेख ‘क्षेत्रपती’ असायला हवा असं मला वाटतं..
मुळात ते ‘क्षेत्रपती’ असेल आणि मग काळाच्या ओघात ते ‘छत्रपती’ झालं असं तर घडलं नसेल? महाराजांचा कट्टर अभिमानी असल्यानं हा प्रश्न मला पडलाय..।।
-गणेश साळुंखे
नमस्कार.
आपला छत्रपती वरील लेख वाचला. व्युत्त्पत्तीचा effort, स्तुत्य, commendable आहे.
# इतिहासाचार्य राजवाडे यांच्या म्हणण्याप्रमानें ही उत्पत्ती भिन्न आहे. त्यावर मी, राजवाड्यांच्या लेखावर आधारित एक टिपण लिहून मराठी सृष्टीला पाठवलें आहे, व ते लौकरव तें upload करतील. वाचल्यानंतर आपलें मय कळवावे.
स्नेहादरपूर्वक
सुभाष नाईक.