नवीन लेखन...

मन एक पाखरू

आकाश सारखे निरभ्र मन असावे
पाण्यासारखे निर्मळ जीवन जगावे
फुलासारखे मनमोहक व्हावे
विचार शुध्द अमर ठेवावे

मन …….मन ही खूप कोमल भावना आहे ,जी प्रत्येकाच्या अंतःकरणात वसलेली आहे.मन हे भणभंनाऱ्या वाऱ्यासारखे , असंख्य प्रश्नासारखे,सागराच्या उफनत्या लाटांप्रमाणे उठणार्‍या भावना लहरी…… मन कधी अनेक समस्यांचे तुफान….. तर कधी आकाशातील रजनीचे शीतल चांदण….. ते कधी सुंदर विचार तर कधी क्रोध मत्सराच्या छटा ……मन कधी प्रेम वात्सल्य दया यांचे सुंदर तोरण तर कधी त्याला द्वेष रागाचे लागलेले ग्रहण…….
मन हे एक विश्वास आहे तर भावनांचा सागर आहे सुगंधी वाऱ्याच्या मंद लहरी नी ध्येयाचा डोंगर आहे……. हे सर्व मनाचे भाव शिल्पाचं….. मनाचे अस्तित्व आहे का? मन कुणी पाहिलं? असे अनेक प्रश्न पण मन जाणवतं मनातल्या मनात.. दुःखाचे वेळी मनाला होणार दुःख तर सुखाचे वेळी ओठावर नकळत येणार हसू . शरीरावर झालेली जखम बसते पण मनावर केलेला घाव हा कायमस्वरूपी असतो हे सर्व मनाच्या अस्तित्वाच्या पाऊलखुणाच की!
मन हे पाखरू आहे जे सदैव व विचारांच्या झोक्यात इकडे तिकडे उडत असते .प्रत्येक गोष्टीत मनाचे अस्तित्व आहे मनाची खोली समुद्राच्या प्रमाणे आहे ज्याची खोली कधीच मापता येत नाही .आपल्या जीवनातील चैतन्य म्हणजे मन आयुष्यात झऱ्याप्रमाणे झुळझुळ वाहणारा उत्साह म्हणजे मन…. आपल्यातील माणुसकीचे प्रतीक म्हणजे मन… जीवनातील अनेक चढउतारांनी गच्च भरलेल असत हे मन मनाचे हवेत असे पैलू पाडता येतात ,हो- नाही ,चांगल-ं वाईट असे अनेक पैलू ने आपण मनाला आकार देतो .मन हे भावनांच्या लहरित वाहत . त्यामुळे त्याला बुद्धीची जोड असते.कोणी कोणी मनाने निर्णय घेतो पण कधी काळी त्या प्रश्नाला त्या निर्णयाला बुद्धीच्या विवेक तेने लढावे लागते. त्यामध्ये काही राहतं व काही जातं या लढाईमध्ये मन तुटक कधीकधी, त्यामुळे मन सारखे दुखाने भरुन वाहत, क्षणभर ते विसावत कुठेतरी मनाच्या एखाद्या कोपर्‍यात तेव्हा मन पाखरू होऊन जातं उडत ते मोकळा श्वास घ्यायला…… आकाशाच्या भव्य पटलावर ,……चंद्र तारांना स्पर्श करण्यासाठी, स्वार होऊन जात होते गारगार ढगांवर इंद्रधनुचा झुला झुलण्यासाठी ,तर ते कधी घेत क्षितिजाला ही त्यालाही कवेत आणि बेधुंद होऊन जातं पक्षांच्या थव्यात मनमुराद उडण्यासाठी मन पाखरू ते त्याच्या पाऊलखुणा थोडीच उमटणार?

फुलांच्या गंधात झुळझुळ झऱ्यात
तुरुतुरु धावे मन पाखरू
इंद्रधनुच्या झुल्यात पक्षांच्या थव्यात
उंच उंच झुले मनपाखरू….
मनाला कोणतीच सीमा नाही पण त्यालासुद्धा उंबरठा लागतो बुद्धीचा ,संयमाचे द्वार नी निश्चयाची साखळीही कोणाला आपल्या मनामध्ये प्रवेश करण्‍यास मनाई ठेवण्यासाठी. आपल्या मनाचा कल्लोळ आपल्याशिवाय दुसऱ्याला एकदा येतो का ?मनाच्या भावनांचा झंजावात ज्याला जिंकता आला तोच अजिंक्य .मनाचा आरसा चेहरा आहे असे म्हटले जाते मनातील भाव चेहऱ्यावर दिसून येतात, ज्याप्रमाणे लहान बालकाचे मन किती निरागस आहे हे त्याच्या निरागस चेहऱ्यावरून बोलक्या डोळ्यावरून दिसून येते तर एकीकडे काही लोक मोठ्या मनाने असे अनेक मुखवटे घालून आपल्या वावरत असतात .जीवनावर प्रेम करणारा पक्षी बेधुंदपणे जीवनाचा आस्वाद घेतो पण त्याच्या पारदर्शक मनामध्ये दाण्याची लालचा देऊन त्याला फसविले जाते. तसेच आपले सुद्धा आहे, त्यामुळे आपल्या मोकळ्या मनाच्या कोणी फायदा घेऊन सुद्धा घेऊ शकतोआपल्या मनावर जाळी टाकण्यासाठी. मनातील राग, द्वेष, निराशा, मनातून काढून आपण जीवन सुंदर बनवू शकतो .सप्तरंगी हे आयुष्य झुलत असताना कोणाचे मन दुखी होईल तसे वागू नका फुलाप्रमाणे आपले मनी सदैव प्रफुल्लीत ठेवावे. चकाकणार्या शांत पाण्याप्रमाणे शुद्ध .मनाची सीमा म्हणजे जणू क्षितिज त्यामध्ये सदैव राहू द्यावे चांगले विचार सदैव खळखळ वाहणाऱ्या झऱ्या प्रमाणे . ज्या मध्ये कपट पणाचा मळ कधीच साचणार नाही कोणावर अधिराज्य करेपर्यंत मनावर राज्य करा. समाजात वावरत असताना दोन प्रकारचे लोक आपण पाहतो ज्यांचे मन सुंदर आहे त्याला कोणाचेही चांगले दिसणार तर त्याच्या मनात कपट पण आहे त्याला कोणी केलेली प्रगती चांगली दिसत नाही .तर ही क्रूर भावना काढून टाका आणि मनमोकळेपणाने जीवनाची भरारी घ्या प्रत्येकाचे दुःख तुम्हाला तुमचे वाटणार कोणाच्या डोळ्यात अश्रू सुद्धा तुम्हाला जाणवणारे असतील. तेव्हा हीच भावना प्रत्येकाची होईल प्रत्येकाच्या मनामध्ये मेलेली माणुसकी पुन्हा जिवंत होईल ,जर हेच झाले तर मानवी जीवनच नव्हे तर सर्व जीवसृष्टी सुखाने नांदेल प्रत्येकाच्या मनामध्ये प्रेम ,दया ,करुणा ,या जिवंत असतील दुरावलेले भावबंध पुन्हा जुळतील. हे सर्व शक्य होईल तेव्हा जेव्हा प्रत्येकाच्या हातातील शस्त्रे गळून पडतील कारण आजच्या छोट्या वादाने उद्याच्या या युद्धाचे बीज रोवले जाते जसे की, लोखंडातून निघणारा गंज ज्याप्रमाणे लोखंडतून जन्मास येऊन लोखंडाचा नाश करतो .त्याप्रमाणे पापी माणसाचे कर्म विनाशाकडे नेत असते तर सर्वांनी या मनाला योग्य वळण द्यावे. बागेतील माळी जसा पाण्याला पाठ करून त्याच्या इच्छेनुसार वळण देतो . बाण नीट वळवणार बाण नीट वळवतो .कुंभार मडक्याला घडवतो त्याचप्रमाणे आपण मनातला योग्य वळण यावे .म्हणून असुद्या सदैव उघड्या मनाच्या खिडक्या भरपूर सूर्यप्रकाश देणाऱ्या मोकळी हवा देणाऱ्या अशा वेळी नसतो मनात कुठल्याच प्रकारचा गुंता, असतात त्या रेशीमगाठी ,हव्या तेव्हा सोडता येणाऱ्या आणि पाहिजे तेव्हा सहज साधणाऱ्या. शेवटी मन बुद्धी भावना यांना मोजण्याचे कोणतेच माप उदंड नाही . ना कोणतेही अचूक परिणाम फक्त त्यांच्या कृतीतून त्या विचारातून भावनेतून आपल्याला सुखद अनुभूतीचा साक्षात्कार होतो. तिथे सुख अन् तेच परमोच्च अवस्था तेथे गळून पडतात साऱ्या समस्या सर्व प्रश्न सा-या विवंचना मोकळा होतो श्वास… एका नव्या आनंदानं फुलत हे जीवन आणि मनमुराद उडत राहत मन पाखरू एका नव्या उमेदीने शेवटी एवढेच सांगावेसे वाटते या
जन्माचे सार्थक व्हावे
पुनर्जन्म पाहिला कोणी
निर्मळ सुंदर जीवन जगा रे
हाच ध्यास तरी ठेवा मनी

— अॅड विशाखा समाधान बोरकर
रा पातूर जिे.अकोला

Avatar
About Adv Vishakha Samadhan Borkar 18 Articles
सामाजिक विषयावर लिखाण,कविता,कादंबरी,ललित लेखन करायला आवडत.
Contact: Facebook

3 Comments on मन एक पाखरू

  1. मन च्या प्रत्येक कोपऱ्यार्चे विशेषण युक्त मार्मिक,खरे वर्णन केलं आहे.
    “ज्याचे मन कपटी त्याला कोणाची प्रगती सहन होत नाही”????

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..