जीवन हे फार मोठे आहे असे अनेक लोक म्हणतात कारण ते नेहमीच दुःखांच्या क्षणांचा विचार करतात. परंतु जर आयुष्यातील आनंददायी क्षणांचा विचार केला तर जीवन हे फार छोटे आहे असे जाणवते. दुःखात क्षण थांबण्याचा भास होतो परंतु तसे नसून तो एक मनाचा खेळ असतो जो आपल्याला त्या परिस्थितीतून बाहेर पडण्याला विरोध करतो. आनंदाचे क्षण चटकन निघून जातात हाही एक भ्रमच कारण माणसाच्या मनाला एक काटा नेहमीच रुतलेला असतो, तो म्हणजे “असमाधानाचा ” तो काटा निघताही नाही आणि नेहमी हळूहळू टोचत राहतो.
समाधान म्हणजे काय ? जे स्वतःला पाहिजेल ते मिळाले तर समाधानी, जसे पाहिजेल तसे झ्हाले तर समाधानी. परंतु या सर्वांच्या उलट झाले तर असमाधानी. खरंच किती छोटी व्याख्या आहे. जर आपण या काट्याला काढून टाकले तर?? ते शक्य असते, जर विचारांना बदलले व ह्या छोट्याश्या व्याख्येत अडकून न राहता यातील खरेपणा जाणलं तरच. एखादी गोष्ट मिळवायची आहे व मनासारखे झाले पाहिजेल असे वाटत असेल तर प्रयत्न करा तसे झाले तर समाधान मानायचे आणि नाही झाले तर …… तरीही प्रयत्न केल्याचे समाधान मानायचे व समाधानाला जागाच द्याची नाही. तसे पण आयुष्यात मिळवणे हेच सर्व काही नसते, अनेक गोष्टी मिळविण्याच्या पलीकडे असतात. ते म्हणजे काही झाले तरी आपल्यातील माणूस जिवंत ठेवणे आणि जे जवळ आहे त्यात आनंद शोधणे, यातही एक वेगळीच मज्जा असते आणि समाधानही मिळते.
— विवेक विजय रणदिवे
लेख वाचून खूप छान वाटले
मस्तच, खूप खूप शुभेच्छा