जगायचे अजुनही राहिले किती
जगुनही जगती या कळले नाही
आठविती सारे क्षण ते भोगलेले
आसक्ती, लालसा संपली नाही
हव्यास, जीवनी असावा किती
याचाच अंदाज बांधता येत नाही
समाधानी वृत्ती सदा मनी असावी
त्यावीण दुजी जगती सुखदा नाही
सुखदुःख, आनंद, दान भाळीचे
भोगण्याविण दुसरा पर्याय नाही
जे जे लाभले ते ते दान भगवंताचे
त्याच्या कृपेविण जीवा सद्गती नाही
हसत खेळत जगुनी जीवा जगवावे
संघर्षात कदापिही मन:शांती नाही
ठेविले अनंते, तैसेची जगी रहावे
याविण दूजा, जीवनाचा अर्थ नाही
— वि.ग.सातपुते. (भावकवी)
9766544908
रचना क्र. १२८.
५ – ५ – २०२२.
Leave a Reply