व्यक्तिमत्व आणि व्यवसाय यांना पूरक अशी collar tune असलेले ( ” माणसाने माणसाशी माणसासम वागणे ” ) श्री अशोक देशमाने यांच्याशी आज एकदाची भेट झाली.
एकदाची या अर्थाने की खूप दिवस आम्ही ठरवत होतो आणि काही केल्या ते जमत नव्हतं. शेवटी काल त्यांनी भेटण्याचे आश्वासन दिले आणि आज दुपारी फोन करून ते माझ्या घरी आले.
त्यांच्या कार्याचा परिचय होताच पण भेटीत अधिक पैलू उलगडले. ” त्यांच्या ” स्नेहवनची जन्मगाथा त्यांच्या तोंडून ऐकण्याचे भाग्य मला आणि माझ्या पत्नीला (आणि थोडावेळ माझ्या नातीलाही) लाभले. आतमध्ये असलेले “मानव्य ” अपेक्षेनुसार पृष्ठभागावर आले आणि आम्ही भारावून गेलो. ५ ऑक्टोबरच्या उदघाटन समारंभाचे त्यांनी आम्हाला निमंत्रण दिले.
आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या ७१ मुला -मुलींना आज त्यांनी आणि त्यांच्या पत्नीने पंखाखाली घेऊन मायेची उब दिलेली आहे. नवनवे उपक्रम त्यांच्या मनात आहेत आणि बरंच काही त्यांना अपेक्षित आहे.
मी माझ्यापरीने काही निधी त्यांना दिला, अजूनही देत राहीन असे त्यांना आश्वासन दिले आहे. “आम्ही बिघडलो ,तुम्ही बिघडा ना ” च्या धर्तीवर सर्वांना माझी विनंती आहे ” आम्ही काही निधी दिला, तुम्हीही द्या “
शक्य झाल्यास “स्नेहवन ” ला भेट द्या – स्वामी विवेकानंद, बाबा आमटे यांच्या प्रेरणेची अनुभूती घेण्यासाठी ! देशमाने कुटुंबीय २०१५ पासून या वेडाला कसे सामावून घेत आहेत ,जपताहेत हे अनुभवा !
अशोक देशमाने – ८७९६४,००४८४
https://snehwan.in/
— डॉ. नितीन हनुमंत देशपांडे
Leave a Reply