आज उरी काहुर आठवांचे
सांजसमयी मनी दाटे हुरहुर
जाहली बघनां तिन्हीसांजा
लोचनी आसवांची झरझर.
सांग प्रतिक्षेत किती झुरावे
गतस्मृतींची मनी दाटे हुरहुर
जरी हुरहुर, प्रीतीची लाघवी
व्याकुळ, जीव होई अनावर
मनांतर आता हे झाले हळवे
गात्रागात्रास विलक्षण हुरहुर
तूच गे एक विश्राम अंतरिचा
तव भेटिचीच मनी दाटे हुरहुर
चराचरी ओसंडलेले रूप तुझे
खुणावते मज प्रहर प्रहर प्रहर
मन हे वेडेच वेडे, तुझ्यात मग्न
श्वासासंगे मनह्रदयी दाटे हुरहुर
— वि.ग.सातपुते. (भावकवी)
9766544908
रचना क्र. १३८.
२१ – ५ – २०२२.
Leave a Reply