माणूस नावाचा शहाणा वेडा
गतजन्मीच्या चुकांत गुरफटतो !
नकळत झालेल्या चुकांच्या परीमार्जनासाठी
चुकीच्या रात्यांवरून भरकट असतो !
नको त्यांच्या संगतीत उठबस करतो
सरते शेवटी कोलांट्या उद्याखात स्तब्ध बसतो !
कळून चुकते एक दिवस त्याला,
माणूस नावाचे आपण शहाणे वेडे आहोत !
मर्यादांचे उल्लंघन करून,
स्वत:चाच घात करीत आहोत !
अचानक भेट होते
अतिशाहाण्याची शहाण्या वेडयाशी !
एकमेकांना मिठीमारून
एकमेक विचारपूस करतात,
कुठे होतास शहाण्या-वेडया इतके दिवस?
अतिशहाणा शहाण्या वेडयाला सांगतो,
तू तरी निदान शहाण्यावेडया
कसेही वागू शकतोस,
अतिशहाण्याला वेडयासारखे
वागताच येत नाही
आणि तेथेच आमची गोची होते !
जगदीश पटवर्धन, दादर
Leave a Reply