नवीन लेखन...

देवपूजेतील अंतिम उपचार – मंत्रपुष्प – भाग २

जगण्याची साधी सोप्पी तत्वे – भाग १०५
आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे – क्रमांक ११
जे जे देवासाठी ते ते देहासाठी – भाग ६१

” ॐ यज्ञेन यज्ञमयजन्त देवास्तानि धर्माणि प्रथमान्यासन् ।
ते ह नाकं महिमानः सचन्त यत्र पूर्वे साध्याः सन्ति देवः ।।

एका गंभीर सुरात सर्वानी मिळून म्हटलेले हे मंत्रपुष्प, केवळ ऐकत असताना देखील अंगावर रोमांच उभे राहातात.

“या सृष्टीचे भरणपोषण यज्ञांनीच होते. यज्ञामुळेच पाऊस पडतो. पाऊस पडल्याने धनधान्य इ.ची भरभराट होते. यज्ञ केल्यामुळे वातावरण निर्जंतुक होते. मन प्रसन्न होते. यज्ञ करण्यामुळेच या समस्त सृष्टीचा विकास होत असतो. यज्ञ केल्याने जे स्थान देवांना प्राप्त झाले, तेच स्थान सर्वांना प्राप्त होवो.”

(बार्शी येथील वेदविज्ञान अनुसंधान केंद्रात, यज्ञ या संदर्भातील वैज्ञानिक तपासण्या पूर्ण झाल्या आहेत.)

अग्निहोत्र, यज्ञ या विषयावर मागे अनेक आरोग्यटीपा लिहून झाल्या असल्याने पुनः चर्चा करत नाही. पण हे यज्ञ अगदी सर्वसामान्य देखील करीत असत. राक्षसानी यज्ञ केल्याने इंद्राचे इंद्रपद धोक्यात आले, अशा गोष्टी आपण पुराणामधे वाचल्या असतीलच. यावरून एकच सांगायचे आहे, की यज्ञ हा भारतातल्या सर्व प्रकारच्या संस्कृतीचा अविभाज्य घटक होता.

मंत्रपुष्पामधे पुढील ऋचा
ॐ राजाधिराय प्रसह्य साहिने….. ही आहे. त्याचा थेट अर्थ आपण पाहू. मनातल्या मनात ही ऋचा प्रत्येकाने म्हणावी आणि अर्थ जाणून घ्यावा.

राजाधिराज वैश्रवण यास आम्ही नम्रभावाने नमस्कार करीत आहोत. मी ज्या ज्या कामना करतो, त्या तो वैश्रवण कामेश्वर देवो. त्या कुबेर वैश्रवण महाराजांना नमस्कार असो !

ॐ स्वस्ति साम्राज्यं भौज्यं….
आम्हाला सर्व प्रकारचे चांगले आणि योग्य सुख प्राप्त होवो.
आमचे साम्राज्य भूमीवरील सर्व चांगल्या आणि योग्य भोगांची प्राप्ती करून देणारे होवो ! आमचे स्वतःचे राज्य व्यापक परमेश्वराच्या राज्याप्रमाणे सार्वभौम आणि चिरकाल टिकणारे असो.

पृथिव्यै समुद्र पर्यताया…..
हे सर्व राज्य ( राष्ट्र ), पृथ्वीपासून समुद्रापर्यंत, सर्व क्षितीज व्यापून टाकणारे, एक अधिपती एकछत्र आणि एकसंघ असलेले होवो. आणि आमच्या राष्ट्राचे हे परम वैभव पहाण्यासाठी आम्हाला दीर्घायुष्य दे !

अविक्षितस्य कामप्रेविश्वेदेवाः सभासद इति ।।
अविक्षिताच मरूत एवढा भाग्यवान होता, की त्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी, देव त्याच्या सभेत त्याच्या भोवती सभासद म्हणून बसत असत. तसेच भाग्य आम्हाला देखील मिळो. आमच्या मनातील सर्व चांगल्या आणि योग्य इच्छा देव पूर्ण करोत.

आपल्या राजासाठी, आपल्या राज्याच्या उत्कर्षासाठी, राजावर पूर्ण विश्वास ठेवून, राजा हाच देव मानून, त्याच्यासाठी, पर्यायाने आपल्यासाठी सर्व सुख मिळावे, राजा सुखी असेल तर, प्रजा सुखी असते. राजा हा सतत प्रजेच्या हितासाठी निर्णय घेत असतो, त्यातच आपले सुख निश्चित आहे हे जाणून, सामुहिकरीत्या म्हटलेले, आणि राष्ट्रप्रेमाने भारलेले हे मंत्रपुष्प ऐकल्यावर, अंगावर रोमांच आले नाहीत तरच नवल !

हे सोळा उपचार पूर्ण झाल्यावर जयघोष करीत, देवाला फुले वाहावीत.
छत्रपती शिवरायांनी रायरेश्वरावर घेतलेली स्वराज्य स्थापनेची घेतलेली पहिली शपथ, त्याचा उद्देश्य आणि मंत्रपुष्पातील उद्देश्य यात काही फरक आहे असे मला वाटत नाही.

जे जे देवासाठी
ते ते देहासाठी
ते ते सर्व देशासाठी सुद्धा !
कारण आपल्या सर्वांचे ध्येय एकच आहे.
आपले राष्ट्र परम वैभवावर पोचावे.

— वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
02362-223423.
२५.०७.२०१७

आजची आरोग्यटीप

Avatar
About (वैद्य) सुविनय दामले 453 Articles
वैद्य सुविनय दामले हे कुडाळ, सिंधूदुर्ग येथील सुप्रसिद्ध आयुर्वेदाचार्य आहेत. ते आयुर्वेद या विषयावर विपुल लेखन करतात तसेच व्याख्यानेही देतात.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..