भक्ती बर्वे केवळ अभिनेत्री नाही, तर उत्तम निवेदिकाही होत्या. त्यांचा जन्म १० सप्टेंबर १९४८ रोजी झाला. त्यांना लहानपणापासून अभिनयाची आवड होती. गणेशोत्सवात छोट्या छोट्या नकलांपासून त्यांच्या अभिनयाला सुरवात झाली, असे म्हणावे लागेल.
त्यांचे उत्तम पाठांतर असल्याने त्यांना पुढे आकाशवाणीवर काम करण्याची संधी मिळाली. त्या दूरदर्शनवर निवेदन करीत होत्या. त्या उपजत अभिनेत्री असल्यामुळे त्यांनी केलेली जवळजवळ सर्वच नाटके सुपर हिट ठरली. नाटक आणि भक्ती बर्वे हे समीकरणच तयार झाले. त्याकाळी नाटकांना वन्स मोअर मिळत असे. त्यामुळेच मराठी रंगभूमीतील भक्ती बर्वे या एकमेव स्त्री स्टार म्हणावे लागेल.‘‘ आकाशवाणीवर आणि दूरदर्शनवर भक्ती बर्वे निवेदिका होत्या. अशोक हांडे यांच्या ‘माणिकमोती’ या कार्यक्रमातही त्यांचे निवेदन असे.
पु.ल.देशपांडे यांच्या ती फुलराणी हे नाटक म्हणजे भक्ती बर्वे यांच्या भूमिकेतील अतुच्य क्षण. ती फुलराणी चे ११११ हून अधिक प्रयोग झाले. आई रिटायर होतेय या नाटकात भक्ती बर्वे यांनी साकारलेली आईची भूमिकाही खूप गाजली. या नाटकाचे एकूण ९५० प्रयोग झाले. मराठी नाट्यक्षेत्रातल्या कामगिरीसाठी ह्यांना १९९० साली संगीत नाटक अकादमी पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. हिंदी चित्रपटांतील सहअभिनेते मा. शफी इनामदार यांच्याशी विवाह झाला होता. अशोक हांडे यांच्या माणिकमोती या कार्यक्रमातही त्यांचे निवेदन असे.
रजनीश जोशी यांनी लिहिलेलं एक होती फुलराणी हे पुस्तक भक्ती बर्वे यांच्या बद्दलच्या खूप छान छान गोष्टींची आठवण करून देते.
भक्ती बर्वे यांचे १२ फेब्रुवारी २००१ रोजी निधन झाले.
भक्ती बर्वे यांनी काम केलेली नाटके.
अखेरचा सवाल, अल्लाउद्दीन व जादूचा दिवा (बालनाट्य), अजब न्याय वर्तुळाचा, आई रिटायर होतेय (मराठी आणि गुजरातीत-बा रिटायर थाय छे), आधे अधुरे(हिंदी आणि मराठी), आले देवाजीच्या मना, कळलाव्या कांद्याची कहाणी (बालनाट्य), गांधी आणि आंबेडकर, घरकुल, चिनी बदाम (बालनाट्य), जादूची वेल (बालनाट्य), टिळक आणि आगरकर, ती फुलराणी, दंबद्वीपचा मुकाबला, पपा सांगा कुणाचे, पळा पळा कोण पुढे पळे तो, पुरुष, पुलं, फुलराणी आणि मी, बाई खुळाबाई, बूटपोलिश, माणसाला डंख मातीचा, मिठीतून मुठीत, रंग माझा वेगळा, रातराणी (मराठी, हिंदी आणि गुजराती), वयं मोठं खोटम् (बालनाट्य), शॉर्टकट, सखी प्रिय सखी, हँड्स अप.
प्रमुख चित्रपट – जाने भी दो यारों (हिंदी) इ.स. १९८३,बहिणाबाई, ‘हजार चौरासी की माँ’ (हिंदी) इ.स. १९९८
— संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
Leave a Reply