नवीन लेखन...

मराठी चित्रपट अभिनेता अभिनय बेर्डे

अभिनय बेर्डेचा जन्म ३ नोव्हेंबर १९९७ रोजी झाला.

प्रिया बेर्डे आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांचा मुलगा म्हणून नुसती ओळख नाही तर अभिनय बेर्डे हा आता अभिनेता म्हणून ओळखला जातो. लक्ष्मीकांत बेर्डे यांचे निधन झाले तेव्हा अभिनय सात वर्षांचा होता. अभिनयचे शिक्षण मुंबईच्या मिठीबाई कॉलेजमध्ये झाले. कॉलेजमध्ये कला शाखेत शिकत असताना भोग या एकांकिकेमधून त्याने यूथ फेस्टिव्हलमध्ये आपला पहिला परफॉर्मन्स दिला होता. या एकांकिकेने पहिले बक्षिस पटकावले, तर अभिनयला अभिनयासाठी उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले होते. आई प्रिया बेर्डेकडून त्याने अभिनयाचे धडे गिरवले. आई बरोबरच अभिनयातील त्यांचे इतर गुरु म्हणजे सचिन पिळगावकर व सतीश राजवाडे. वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत अभिनय बेर्डे याने चित्रपटसृष्टीत पदार्पण केले.

ti sadhya kay karte: Laxmikant Berde's son Abhinay to make his acting debut  | Marathi Movie News - Times of Indiaअभिनय बेर्डे ने ‘ती सध्या काय करते’ या चित्रपटातून मराठी सिनेसृष्टीत प्रवेश केला. या सिनेमातील अभिनय बेर्डेच्या कामाचे सगळीकडून खूप कौतूक झाले. मराठी फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यात अभिनयला ‘ती सध्या काय करते’ या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला होते. खरं तर अभिनयला वडिलांच्या नावावर सिनेजगतात पाऊल टाकणे शक्य होते, मात्र आपल्या आडनावाकडे बघून लोकांनी काम देऊ नये, असे त्याला वाटते.

अभिनयला विनोदी भूमिकांपेक्षा गंभीर आणि वास्तववादी भूमिका करायला अधिक आवडतात.’ती सध्या काय करते’, ‘रंपाट’, अशी ही आशिकी हे त्यांचे चित्रपट. मला अभिनयात अजून खूप शिकायचे आहे. पाया मजबूत करुन लांबचा पल्ला गाठायचा आहे, असे अभिनयने एका मुलाखतीत सांगितले आहे.

अभिनयची बहीण स्वानंदी बेर्डे ही पण अभिनेत्री असून तिचे ‘धनंजय माने इथंच राहतात’ हे नाटक नुकतेच रंगमंचावर आले आहे.

— संजीव वेलणकर.

९४२२३०१७३३

पुणे.

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4354 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..