मराठीसृष्टीने नुकत्याच केलेल्या एका सर्व्हेचे निष्कर्ष आत्ताच आले आहेत. या सर्व्हेचा विषय होता मराठीतून इमेल आणि ऑनलाईन प्रतिक्रिया पाठविण्याविषयी. यात सहभागी झालेल्या व्यक्तींकडून आलेल्या माहितीतून दिसते की अजूनही ७७ टक्क्यांपेक्षा जास्त मराठी माणसे आपल्या आपापसातील संपर्काची भाषा म्हणून इंग्रजीचाच वापर करतात.
आपण २१ व्या शतकाकडे वाटचाल करताना नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करित जगाबरोबर चालतो आहोत. संगणकावरील मानवी कार्ये अनिवार्य बनली आहेत किंबहुना ती आज काळाची गरज झाली आहेत
संगणकाचा जन्म इंग्रजी संस्कृतीमध्ये जरी झाला असला तरी आज जगामध्ये प्रादेशिक भाषेमधून काम सोपे आणि जलद झाले आहे. भारतामध्येच आजच्या घडीला आपापल्या मातृभाषेमधून संगणकावर कामे होऊ लागलेली आहेत. तर मग आपला महाराष्ट्र का बरे मागे राहिल?
आपण आपल्या नातेवाईकांना, मित्रांना किंवा शासकीय कार्यालयांना ईमेल पाठवितो तेव्हा शक्यतो इंग्रजी मधूनच मेल पाठविले जाते. आपले स्नेही मराठी का असेना, पण आपण त्यांना ईमेल चक्क इंग्रजीतूनच पाठवितो. आज मराठी ई-मेल सेवा देणार्या साईटची संख्या लक्षणीय आहे आणि अनेक वेबसाईटस तसेच इ-मेल सेवा देणार्या साईटसवरुन मराठी किंवा इतर प्रादेशिक भाषेमधुन मराठी मेल करणे सहज सोपे झाले आहे. जीमेल सुद्धा चांगला पर्याय आहे. तरी आपण शक्यतो कोणालाही मेल पाठविताना मराठीतूनच पाठवून पहा बरं. कसा चांगला अभिप्राय येतो आपल्याला.
युनिकोडच्या आगमनानंतर मराठीतून मेल पाठविल्यावर समोरच्या व्यक्तीला मराठी फाँट डाऊनलोड वगैरे करण्याची अजिबात गरज नसते. त्यामुळे ती व्यक्ती सुद्धा आनंदाने आपले मराठी मेल वाचू शकते.
तर चला तर या पुढे आपण मराठीचा संगणकावर जास्तीत जास्त वापर करुया. मराठीला जगामध्ये ऊंचावर नेऊन ठेऊया.
मी फेसबुक आणि इतर ठिकाणी मराठीच वापरतो. त्या मुळे इतरांना ही मराठीत उत्तर देणे भाग पडते.