मी आधी सही करणार ., ती म्हणाली ..
नाही मी आधी सही करणार मी म्हणालो..
दोघेही हसत म्हणालो.
आम्ही दोघे सरकारी ऑफिसमध्ये बसून हे बोलत होतो
समोरचा अधिकारी पार हबकला होता,
बाजूला असलेल्या दोनचार जणांची हीच अवस्था होती.
खरे तर आम्ही डिवोर्स पेपर्स वर सही करत होतो ,
त्या ऑफिसला हा प्रकार एकदम विचित्रच ?
आम्ही वर्षांपूर्वी लग्न केले ,
त्याआधी चागले चार वर्षे फिरत होतो.
लग्न झाले खूप बरे वाटले , पण सुरवातीलाच मग मात्र ..
लग्न हा प्रकार अडचणींचा वाटू लागला.
सर्व घराचे नियम आले ,
मग औपचारिकता आली आमचे लग्न विस्कटू लागले ,
उगाच वाद होऊ लागले.
शेवटी ठरवले , यातून मार्ग काढावा म्हणून , शांतपणे
न भांडता चर्चा केली तेव्हा लक्षात आले
आम्ही लग्न केले खरे पण लग्न समजू शकलो नाही.
यावर मार्ग काय तर वेगेळे होणे.
शेवटी ठरले ,
दोघांच्या घरी फुल टेन्स वातावरण .
घरच्यांचे ऐकायचे नाही ठरले..
नाहीतर आयुष्यभर एकमेकांना झेलावे लागणार ..
अर्थात संस्कारी लोक , काहीही अर्थ लावतील याचा ,
म्हणतील
तुमच्यावर हेच का संस्कार वगैरे वगैरे.
असे बोलणारे पुरुष बॉसिंग करत असतातच परंतु
बाहेर मात्र त्यांचा वेगळा चेहरा असतो ,
जर बारकाईने बघितले तर जाणवेल ..
तर आम्ही आज वेगळे झालो..
त्या ऑफिसच्या अधिकाऱ्याला थँक्स बोललो.
तो ऑफिसर म्हणाला सर , एक विनंती आहे..
एक ग्रुप फोटो काढू शकतो का ?
मी अहो असे का…
तो म्हणाला ..
मला असे जोडपे आयुष्यात बघायला मिळणार नाही..
आम्ही हसलो..
फोटो झाला…
बाहेर आलो ती म्हणाली ..
संध्याकाळी कॉल करते..
आपण आज पार्टी करू.
मी ओ के ..म्हणालो ..
आज ती कुठे आहे ते माहीत नाही…
माझे लग्न झाले…
तिचे काय झाले ते माहीत नाही..
सतीश चाफेकर
Leave a Reply