मी पाऊल पाऊल हळुच निघालो
संध्येच्या अनवट वेळी
तरू-तरुंवर पसरत होती
क्षितिजावरची सांज सावळी
मी बघता वळून मागे
दूर दिव्यांचा चमके लोलक
मी सांधून घेतो सुटले धागे
चांदण्यात भिजले मोहक
पाऊलवाटा निजल्या होत्या
आठवणींची होती सोबत
वेचून मोती गतकाळाचे मग
पूर्वेला पाऊल पडते अलगद…
— आनंद
Leave a Reply