मीना कपूर यांचे वडील विक्रम कपूर हे कलकत्त्याच्या न्यू थिएटर्स स्टुडिओचे अभिनेते होते. चित्रपट निर्माते पी.सी. बरुआ हेही त्यांचे नातेवाईक होते. यांमुळे कपूर यांचा चित्रपटात प्रवेश सुकर झाला. मीना कपूर यांनी आपल्या लहानश्या करीयरची सुरवात १९४६ साली नीनु मुजुमदार यांच्या आठ दिन या चित्रपटापासून केली. याला संगीत एस.डी.बर्मन यांचे हो. गायिका मीना कपूर या संगीतकार अनिल विश्वास यांच्या पत्नी. मीना कपूर यांचा संगीतकार अनिल विश्वास यांच्याशी १९५९ मध्ये विवाह झाला.
मीना कपूर यांचे नाव घेताच चटदिशी आठवते ते गाणे म्हणजे “कुछ और जमाना केहता है” हे ‘छोटी छोटी बाते’ या स्वर्गीय मोतीलाल निर्मित चित्रपटातील अनिल विश्वास यानीच संगीतबद्ध केलेले सुरेख गीत, जे नादिरा यांच्यावर चित्रीत झाले होते. ‘परदेसी’ मधील ‘रसिया रे मन बसिया रे’ हे एक आणि “आँखे” मधील ‘मोरे अटरिय पे कागा’ हे आणखीन एक प्रकर्षाने आठवणारे गीत. अनिलदांच्या निधनानंतर ‘अमर उत्पल’ या त्यांच्या मुलांजवळ राहात असत अमर उत्पल या जोडीने बिग बी च्या ‘शहेनशहा’ चे संगीत दिग्दर्शन केले होते. मीना कपूर यांनी १२५ हून अधिक गाणी गायली होती. यातील सी रामचंद्र यांच्या बरोबरचे मेरी जान संडे के संडे’, व’रसिया रे मन बसिया रे’ ही त्यांची गाजलेली गाणी. मीना कपूर यांचे २३ नोव्हेंबर २०१७ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
मीना कपूर यांची गाणी
https://www.youtube.com/playlist…
मेरी जान संडे के संडे’
Leave a Reply