उद्यद्भानु सहस्रकोटिसदृशां केयूरहारोज्ज्वलां
बिम्बोष्ठीं स्मितदन्तपंक्तिरुचिरां पीताम्बरालंकृताम् ।
विष्णुब्रह्मसुरेन्द्रसेवितपदां तत्वस्वरूपां शिवां
मीनाक्षीं प्रणतोऽस्मि संततमहं कारुण्यवारांनिधिम् ॥ १॥
मीन म्हणजे मासोळी. अक्ष म्हणजे डोळे. जिचे डोळे मासोळी प्रमाणे लांब, दोन्हीकडे निमुळते, त्यातही कानाकडे अधिक वाढलेले आणि मध्यभागी विशाल असतात ती मीनाक्षी. मासोळीचे डोळे टपोरे असतात. तसे जिचे नेत्र ती मीनाक्षी.
अशा प्रकारच्या सुंदर नेत्रांनी सुशोभित आई जगदंबे चे नाव आहे मीनाक्षी.
दक्षिण भारतात मदुराई नामक स्थानी देवी मीनाक्षीचे विश्व प्रसिद्ध मंदिर आहे.
या देवी मीनाक्षीच्या वंदनार्थ आचार्यश्रींनी मीनाक्षी पंचरत्नम् आणि मीनाक्षी स्तोत्रम् अशा दोन रचना केल्या आहेत.
या मीनाक्षी पंचरत्नम् स्तोत्रामध्ये आईचे वर्णन करताना आचार्यश्री म्हणतात,
उद्यद्भानु सहस्रकोटिसदृशां- हजारो कोटी सूर्य एकाच वेळी उगवले तर ते तेज जसे असेल तशी तेजस्वी असणारी. तरीही उगवत्या सूर्याप्रमाणे आल्हाददायक.
केयूर- बाजूबंद
हार- गळ्यात,केसात शोभणाऱ्या मोत्यांच्या माळा.
उज्ज्वलां- अत्यंत तेजस्वी आहेत अशी. त्यांच्या सौंदर्याने अधिकच तेजस्वी दिसणारी.
बिम्बोष्ठीं- पिकलेल्या तोंडल्याप्रमाणे लाल बुंद ओठ असणारी. स्मितदन्तपंक्तिरुचिरां- किंचित् हास्य केल्यामुळे जिची दंतपंक्ती दिसून येत असल्याने अधिकच सुंदर दिसणारी.
पीताम्बरालंकृताम् – दिव्य असा पीतांबर धारण केलेली.
विष्णुब्रह्मसुरेन्द्रसेवितपदां – विष्णू, ब्रह्मदेव इत्यादि महेश्वर, सुरेंद्र अर्थात देवराज इंद्र. त्यांच्यासह समस्त देवतां जिच्या चरणांची सेवा करत असतात अशी.
त
त्वस्वरूपां – परब्रह्मस्वरूप असणारी.
शिवां- अत्यंत पवित्र, भगवान शंकरांची सहधर्मचारिणी.
मीनाक्षीं प्रणतोऽस्मि संततमहं कारुण्यवारांनिधिम्- कारुण्य सागर स्वरूप असणाऱ्या अशा देवी मीनाक्षी ला मी सतत वंदन करतो.
— प्रा. स्वानंद गजानन पुंड
Leave a Reply