आसावली काळी माती, ऊरी वैशाख सलतो
नभ निथळते खाली, गंध चौखूर फुलतो
मृग,रोहिणीच्या गाली, जुन्या श्रावणाच्या खुणा
अंग आषाढी नभाचे, ओढ पावसाची पुन्हा
चिंब रानाला झोंबली, श्रावणाची सळसळ
आज मुरल्या मातीनं, किती सोसलेली कळ
निळ्या नभाच्या डोळ्यात, पुन्हा मातीसाठी पाणी
रानपाखरांच्या ओठी , खुळ्या पावसाची गाणी
मेघ मल्हाराचे सूर, कोण आळवितो ताणे
शब्द सुरांनी छेडले, नभ मातीचे उखाणे
डाॅ.धोंडोपंत मानवतकर
मराठीसृष्टी टीमचे आभार.!