नवीन लेखन...

संगीतकार, संयोजक, वादक अरुण पौडवाल

एकापेक्षा एक सुरेल गीतांनी मराठी-हिंदी सिनेजगतात आपली छाप सोडणारे संगीतकार अनिल-अरुण अर्थात अनिल मोहिले व अरुण पौडवाल यांनी संगीतबद्ध केलेल्या बहारदार गीतांचे गारूड आजही रसिकांच्या मनावर आहे. मराठीतले शंकर-जयकिशन अशी ओळख असणाऱ्या या संगीतकार जोडीची कारकीर्द विलक्षण गाजली.

या जोडीने मराठी चित्रपट संगीताचा चेहरा-मोहरा बदलवुन टाकला, मराठी भावगीत पाश्चात्य वाद्यांनी, कुशल वाद्यवृंदाच्या ताफ्यात सजविले, अनेक चित्रपटांना उत्तम संगीत दिले. प्रो.बी आर.देवधर यांच्याकडे शास्त्रोक्त संगीत शिकलेल्या अरुण पौडवाल यांनी एस.डी.बर्मन ,कल्याणजी आनंदजी,लक्ष्मीकांत प्यारेलाल,बाप्पि लाहिरी, आर.डी.बर्मन यांच्याकडे अॅकॉर्डीयन वादन केले. संगीत संयोजन करताकरता अरुण पौडवाल यांनी १९७१ मधे संगीतकार म्हणून आशा भोसले यांच्या आवाजात एक ध्वनिफीत केली.”ओटीत घातली मुलगी विहीणबाई ”गदिमांनी केलेली ही विहीण पारंपारिक होती पण नवेपण घेऊन आली होती. ”हरीनाम मुखी रंगते”हे गोड भक्तीगीत तसेच ”रुपेरी वाळूत माडांच्या बनात”,”येऊ कशी प्रिया”हि गीते त्यांचा आधुनिक वाद्यवृंद आणि सुंदर चाली यामुळे तरुणाईत विशेष लोकप्रिय झाली. ससा तो कसा हे बालगीत,सूर सनईत नादावला सारखे गंभीर प्रकृतीचे गीत,गंधित धुंदीत होऊनी सजणा सारखे उडत्या चालीचे गाणे त्यांनी दिले. तसेच आपली पत्नी अनुराधा पौडवाल यांना ”डोळ्यावरून माझ्या उतरून रात्र गेली ”हे गझल सदृश गीत आणि ”रसिका मी कैसे गाऊ गीत”हि दादरा तालातील गीते अरुण पौडवाल यांनी दिली. मराठी चित्रपटसृष्टीत अनिल-अरुण या जोडीने अष्टविनायक या चित्रपटाला दिलेल्या संगीतामुळे त्यांना भरपूर प्रसिद्धी मिळाली. अनिल मोहिले आणि अरुण पौडवाल या जोडगोळीने यानंतरही अनेक अप्रतिम गाणी दिली. शब्द-सुरांवर जबरदस्त हुकुमत असलेल्या या संगीतकार जोडीने अनेक हिट गाणी दिली आहेत. निर्माते शरद व सचिन पिळगावकर यांच्या चित्रपटातील अनिल-अरुण यांनी संगीतबद्ध केलेल्या सर्वच गीतांनी गोल्डन व सिल्व्हर ज्युबिली साजरी केली आहे. संगीतात उत्तम कामगिरी बजावणाऱ्या या संगीतकारांच्या गीतांची जादू आजही आहे.

अरुण पौडवाल यांची पत्नी सुप्रसिद्ध गायिका अनुराधा पौडवाल. त्यांची मुलगी कविता पौडवाल ही देखील गायिका बनली आहे, कविताने आतापर्यंत १६ भक्ती अल्बम काढले आहेत. गरबा दांडीया यांसारख्या लहान इवेंट्समध्ये ती गाणे गाते. मुलगा आदित्य हा संगीतकार आहे.

अरुण पौडवाल यांचे १ नोव्हेंबर १९९१ रोजी निधन झाले.

— संजीव वेलणकर
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4354 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..