सतत नाम घेण्यासाठीं, बुद्धी दे रे मजला,
आठवण तुझी ठेवण्याची, वृत्ती दे रे मनाला ।।धृ।।
श्वासात प्राण म्हणूनी, अस्तित्व तुझेच जाणी,
श्वास घेण्याची शक्ती, तुझ्याचमुळे असती,
जीवनातील चैतन्य, तुजमुळेच मिळते सर्वांना ।।१।।
सतत नाम घेण्यासाठी बुद्धी दे रे मजला,
अन्नामधले जीवन सत्व, तूच ते महान तत्व,
सुंदर अशी सृष्टी, बघण्या ते दिली दृष्टी,
आस्वाद घेण्या जगताचा, जागृत ठेवी भावनेला ।।२।।
सतत नाम घेण्यासाठी, बुद्धी दे रे मजला
निनादाच्या लहरी, तन्मयतेने श्रवण करी,
आभार मान्यता मति, परि शब्दही कमी पडती,
जगणेच कठीण वाटते, क्षणभर तुजविण कुणाला ।।३।।
सतत नाम घेण्यासाठी बुद्धी दे रे मजला
जाणून तव उपकार, मानावे सदैव आभार,
ही भावना येते मनी, जावे तुझ्यात समावूनी,
रोम रोमातूनी माझ्या, नामाच्या दे गतिला ।।४।।
सतत नाम घेण्यासाठी बुद्धी दे रे मजला
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क – ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
Leave a Reply