नभांगणी आज मेघ,
कुठून कुठे चालले,
शेकडो योजने प्रवास त्यांचा,
कोणी त्याला मापिले,–!!
निळे काळे भरले ढग,
एकत्र जमून पुढे चालले
स्वैर विहरती त्यात विहग,
लांबवरी ते उडत चालले,–!!!
या मेघांची बनते माला,
इकडून तिकडून सर्व बाजूला,
जसा लवाजम्यात घोळका,
निघाला तसा काफिला,–!!!
मध्येच एखादा मेघ डोकावे,
संजीवनाने ओथंबलेला,
अशा काळ्याशार ढगात, जीवनदाते नीर भरले,–!!!
कोणाची असेल ओढ,
कोण प्रेमे त्यांना बोलावे,
क्षितिज पसरलेले विस्तीर्ण, ठिकाणा त्याचा कैसा ठांवे,–!!!
येता जवळी सूर्यराज,
काय त्यांचे होत असावे,
का त्याच्यापुढे झुकत,
अर्पित आपले जीवन करावे,–!!
असा सहज करती त्याग,
दुसऱ्यास सगळे देऊन टाकणे, म्हणूनच ते निसर्गनिर्मित,
मानवाने उदाहरण शिकणे,–!!!
नसते काही त्यांच्याजवळ,
अहंबुद्धी, मी माझेपण
बघता बघता ते देती स्वतःस, आनंदे करत समर्पण,–!!!
वृत्ती उदार त्यांची शिकत,
निसर्गघटकांनुसार वागावे,
आपण सारे कूपमंडूक,
कोष फोडुनी बाहेर यावे,,–!!!
श्रेष्ठ गुरु राजा निसर्ग,
न बोलताही बरेच शिकवे,
कळले ज्याला ते शहाणपण,
तो संकुचित दृष्टी डांवले,–!!!
हिमगौरी कर्वे©
Leave a Reply