नाही म्हणण्याची ताकद आम्ही हरवून बसलो आहोत का हा प्रश्न माझ्या मनात हल्ली वारंवार येतो . त्याला करणे अनेक आहेत अर्थात ती ताकद आम्ही आधीच हरवून बसलो आहोत फक्त आता त्याची जाणीव प्रकर्षाने होत आहे. मी ७५ वर्षाचा झालो मी ८० वर्षाचा झालो हे हळूच चार सहा महिने आधी योग्य व्यक्तीला सुचवले जाते आणि ती प्रोसेस सुरु होते. मग पुढे त्याची साखळी तयार होते, तू माझ्यासाठी कर , मी तुझ्यासाठी करतो.
मग तो सत्काराचा दिवस पार पडतो, स्थानिक पुरवणीत फोटो येतात.
खरेच ह्यावेळी आपण वापरले जात आहोत याचे भान नसते.
तुमचे कार्य निश्चित मोठे असेल परंतु काही गोष्टी कटाक्षाने पाळल्या पाहिजेत.
त्याची गोळाबेरीज होते आणि तो एखाद्या कंपूत अडकवला जातो सहजपणे, त्याने जे काम केले त्याची माती होते केवळ मोह न टाळल्यामुळे , नाही न म्हटल्यामुळे.
सत्कार करणारा आपला राजकीय प्रोफाईल पक्का करतो, तो संधीच शोधत असतो , मला चांगला ‘ प्लॅटफॉर्म ‘ मिळेल का ?
विचार करा की,
‘ नाही ‘ ह्या शब्दात किती ताकद आहे, अर्थात आपली नाळ आपणच तोडणे गरजेचे असते .
— सतीश चाफेकर.
Leave a Reply