नवीन लेखन...

नमस्कार – भाग २ 

जगण्याची साधी सोप्पी तत्वे – भाग ९६
आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे – क्रमांक ११
जे जे देवासाठी ते ते देहासाठी – भाग ५२

बायकांनी नमस्कार करायची पद्धत वेगळी. पुरूषांची वेगळी. पुरूषांचा नमस्कार साष्टांग. जमिनीवर पडून आठ अंगांचा स्पर्श जमिनीला करून पुनः उठायचे. नमस्कार जरी देवाला घालत असलो तरी फायदा आपल्यालाच होतो ना ! शरीराला आणि मनाला देखील.

नमस्कार म्हणजे लीनता. शरणागत भाव. माझ्यापेक्षा ज्ञानाने, तपाने, बुद्धीने, वयाने, सामर्थ्याने, अभ्यासाने, जे अधिक आहेत, त्यांच्या समोर नतमस्तक होताना मनातील दोष निघून जातात.

ज्याच्याकडे चाकरी करतोय, त्यांना मालक म्हणून केलेला नमस्कार वेगळा. त्यातील भाव वेगळा. मालकाने दिलेल्या पैशामुळे माझा चरितार्थ चालणार आहे, म्हणून याला नमस्कार करायला हवा. मालकाला खुश ठेवण्यासाठी, मालकाचा अहं सुखावण्यासाठी केलेला हा नमस्कार मनापासून केलेला नसतो.

राजकारणातल्या नमस्काराची रीतच वेगळी. न बोललेलंच बरं. हे नमस्कार म्हणजे नुसती चमचेगिरी ! पक्ष बदलला की व्यक्तीनिष्ठा बदलली. की नमस्कार बदलला.

नमस्कार करण्याचा आणखी एक प्रकार म्हणजे सॅल्युट. एनएसएसेस चे कॅडेटस, एनसीसी छात्र, स्काऊट गाईडचे कब, बुलबुल्स, मिलीट्रीमधले सैनिक, पोलीस जो नमस्कार करतात, ते सॅल्युट प्रकारामधे येतात. पण नेपाळी गुरखा जो नमस्कार करतो, त्यातला सॅल्युट भाव वेगळा आणि तिरंग्याला जेव्हा कडक सॅल्युट ठोकतो, तो भाव वेगळा. माझा नमस्कार कोणासाठी आहे तेवढा त्यातील भाव वेगळा. काहीवेळा तोंडदेखलेपणा किंवा ड्यूटी म्हणून तर काही वेळा मजबूरी म्हणून ! साहेबाची गाडी येत असते, तेव्हा त्या गाडीला देखील सॅल्युट ठोकावा लागतो.

राजाला करत असलेला मुजरा हा देखील नमस्काराचाच एक प्रकार. कमरेत नव्वद अंशात वाकत, हात जमिनीपासून आपल्या कपाळापर्यतदोन तीन वेळा वरखाली करणे हा राजाला दिलेला सन्मानाचा नमस्कार आहे.

गुरूला करत असलेला नमस्कार फारच वेगळा. गुरूच्या उजव्या पायाला आपल्या उजव्या हाताने आणि डाव्या पायाला आपल्या डाव्या हाताने, आपले हात एकमेकांवर स्वस्तिकासारखे करून केलेला नमस्कार जगात दुसरीकडे कुठेच आढळणार नाही. या नमस्कारातील भाव वेगळा.

एका हाताने कधीही नमस्कार करू नये, असे हिंदु धर्म सांगत असूनही कपाळाला, छातीला आणि दोन्ही खांद्यांना स्पर्श करून नमस्कार करण्याची पद्धत हिंदुमधे आली. हे केवळ हिंदु धर्माचा अभ्यास नसल्यामुळेच. हिंदु पद्धतीने नमस्कार करण्यामधे देखील शास्त्र आहे. पण आमच्या शालेय अभ्यासक्रमातूनच हे डिलीट केल्यामुळे केवळ हिंदु घरात जन्माला आलोय म्हणून हिंदु. पण इतर धर्मातील लहान लहान मुलांना त्यांनी नमस्कार कसा करावा, का करावा, हे त्या त्या धर्मानुसार, प्रत्येक घरात शिकवले जाते.

आणि बायकांचा नमस्कार कमरेमध्ये वाकून ! नुसतं वाकायचं नाही तर वाकून डाव्या पायाच्या करंगळीपासून उजव्या पायाच्या करंगळीपर्यंत नमस्कार अवस्थेमधे हात वर खाली हलवत अर्धगोलाकार वळायचे ! पोट दाबले जाते, गर्भाशयातील दोष पिळले जातात, कंबर हलवली जाते, खांदे हलवले जातात, पाठीचा कणा, वाकवला जातो, मनगटे सैल करून घेतली जातात, असा नमस्कार केला तर, किती उत्तम व्यायाम आहे हा !

“एक काम धड नीटपणे करता येत नाही” असं म्हणत दोन्ही हातानी टाळी वाजवत बायकोनं कोपरापासून केलेल्या नमस्काराला काय नाव द्यावं हो ? ही कदाचित जागतिक लेव्हलची शंका असेल.

वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021

02362-223423.
16.07.2017

आजची आरोग्यटीप

Avatar
About (वैद्य) सुविनय दामले 453 Articles
वैद्य सुविनय दामले हे कुडाळ, सिंधूदुर्ग येथील सुप्रसिद्ध आयुर्वेदाचार्य आहेत. ते आयुर्वेद या विषयावर विपुल लेखन करतात तसेच व्याख्यानेही देतात.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..