जेव्हा दुजाचे नुकसान होते, उत्सुक दिसे कुणी
स्वभावाची ही विकृती जाणता, खंत वाटली मनी
बागेमध्ये फिरत असता, फूल तोडतो अकारण
सुगंध त्याचा क्षणीक घेवूनी, देतो ते फेकून
हाती देता सुंदर खेळणी, तोड मोड करिते
लहान बालक खेळण्यापेक्षा, तोडण्यात दंग होते
लय पावणे प्रतिक शिवाचे, ईश्वरी असतो गुण
‘नष्ट करणे’ निसर्ग स्वभाव, हे घ्या तुम्ही जाणून.
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क – ९००४०७९८५०
Leave a Reply