चांदनी बार, पेज थ्री, कॉर्पोरेट, फॅशन अशा अनेक रियलिस्टिक सिनेमांचं दिग्दर्शन मधुर भांडारकर यांनी केलेलं आहे. त्यांचा जन्म २६ ऑगस्ट १९६८ रोजी झाला. ग्लॅमरस जगाचं वास्तव त्यानं जगापुढे आणलं. गुरुदत्त, विमलदा, श्याम बेनेगल, व्ही शांताराम हे मधुर भांडारकर यांचे आवडते दिग्दर्शक. मधुर एका सर्वसामान्य कुटुंबातला मुलगा.
घरात फिल्म इंडस्ट्रीची बॅकग्राउंड नाही. पण तरीही लहानपणापासूनच त्याला सिनेमात प्रचंड इंटरेस्ट होता. थिएटरमध्ये जाऊन चित्रपट बघणं परवडत नसल्याने त्याने रस्त्यावर, मेळ्यांमध्ये, सार्वजनिक सत्यनारायणाच्या पूजेत असे साधारण १५०० चित्रपट त्यानं पाहिले. ज्या वयात मुलं अमर चित्रकथा, चांदोबा वाचायचे, त्या वयापासून तो स्टारडस्ट, फिल्म फेअर अशी मॅगेझीन्स वाचायचा.अशोक गायकवाडांकडे इंटर्नशिप केली. नंतर रंगिला, रात, रेवती अशा चित्रपटांत राम गोपाल वर्मांना असिस्टही केलं.
त्रिशक्ती हा मधुरचा पहिला सिनेमा. त्याच्या इतर सिनेमांपेक्षा हा पूर्णपणे वेगळा होता. चांदनी बार या चित्रपटानं मधुरला खरी ओळख मिळवून दिली. त्याविषयी बोलताना मधुर भांडारकर म्हणतात ‘स्ट्रगलिंगच्या काळात माझा मित्र मला एका बारमध्ये घेऊन गेला. तो लेडिज बार होता. म्हणजे एकदम वेगळच वातावरण. शिफॉन साडीतल्या बायका, लाउड म्युझिक सगळं वातावरणच वेगळं होतं. मी मित्राला म्हटलं अरे कुठे घेऊन येतोस मला… लोक म्हणतील फिल्म फ्लॉप झाली म्हणून मधुर आता इकडे दिसायला लागला. मी लवकरात लवकर तिथून बाहेर पडलो. पण घरी आल्यावर मला जाणवलं की त्यातलं ते जे गाणं होतं मुंगळा मुंगळा ते गाणं माझ्या डोक्यात बसलं होतं. दुसर्याल दिवशी मी मित्राला म्हटलं मला बारमध्ये जायचय. मग आम्ही तीन-चार बार फिरलो.
शेवटी सायन-कोळीवाड्यातल्या एका जुनाट बारमध्ये मी निर्णय घेतला की आपण बारवर फिल्म बनवायची. मग मी त्यावर रिसर्च केला. ४-५ महिने मी वेगवेगळ्या बारमध्ये जाऊन बसायचो. कनेक्शन्स काढली. कॉन्टॅक्ट्स मिळवले आणि मग पिक्चर बनवला. मधुर भांडारकर यांना तीन वेळा नॅशनल अॅववॉर्ड् मिळाले आहे. मधुर भांडारकर यांचे प्रमुख चित्रपट:- चांदनी बार, सत्ता, पेज थ्री, कॉर्पोरेट, ट्राफीक सिग्नल.
श्री.संजीव, वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ :-इंटरनेट
Leave a Reply