जागतिक अवदान दिन (Organ Donation Day) दर वर्षी १३ ऑगस्ट या दिवशी साजरा केला जात असला तरी भारतामध्ये अवयवदान दिन २७ नोव्हेंबरला साजरा केला जातो. या दिवशी अवयवदानाबात असलेले समज-गैरसमज दूर सारून समाजात जनजागृती केली जाते.
प्रत्यारोपणाभावी सुमारे पाच लाखाहून अधिक रुग्णांना आपला जीव गमवावा लागत आहे. मृत्यू पश्चात आणि जीवंतपणीदेखील काही अवयवांचे दान करणं शक्य असते. यामुळे अनेकांना विविध स्वरूपात जीवनदान मिळू शकते.
मृत्यूनंतर जसे अवयवदान केले जाते तसेच जिवंतपणी यकृतदान, किडनीदान, गर्भाशयाचे दान केले जाऊ शकते. ब्रेनडेड व्यक्तिंमध्ये मूत्रपिंड, फुफ्फुसे, यकृत, स्वादुपिंड, हृदय, आतडं, नेत्र, त्वचा, हृदयाची झडप यांचे दान करणं शक्य आहे. २०१९ मध्ये भारतातील अवयवदानात महाराष्ट्र राज्याची सर्वोत्तम कामगिरी होती.
तुमच्यादेखील मनात अशाच प्रकारचे काही समज-गैरसमज असतील तर ते दूर करून आजच अवयवदानासाठी एक पाऊल पुढे या !
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply