पूर्वी कसे नवरात्रीला
नऊ दिवस आपण
नऊ रंगाचे कपडे
परिधान करायचो…
तू नाचायचीस मनसोक्त
आणि मी तुझं ते
नाचणं डोळेभरून
पाहत राहायचो…
रंगाच फार काही नाही
पण तू जवळ असल्यावर
मी नेहमीच आनंदात
भरभरून जगायचो…
तुझा आनंद मी माझ्या
हृदयात साठवून तो
साऱ्या जगाला हसत
आनंदाने वाटायचो…
आता फक्त राहतो उभा
तुझी वाट पाहत
तसाच त्या वळणावर
जसा पूर्वी राहायचो…
© कवी – निलेश बामणे
दिनांक – ९ ऑक्टोबर २०२१
Leave a Reply