मी तुला स्वप्नात पाहू लागले
दूर रानी मोर नाचू लागले
दिवस हे नाहीत जरिही पावसाचे
का अवेळी मेघ बरसू लागले?
चाललो एकत्र इतुकी पावले
मी नव्याने तुज बघाया लागले
फिरुन का मी षोडषी झाले आता?
हृदय माझे धडधडाया लागले
काय हे माझे तुझे नाते असे?
हृदयास मी माझ्या पुसाया लागले
तू नको देऊ उजाळा आठवांना
काठ डोळ्यांचे भिजाया लागले
–सौ. राजलक्ष्मी देशपांडे
Leave a Reply