मर्यादेच्या कुंपणात राहूनच करायचंय सगळं
संस्कार माझे हतबल होतीलच कसे..?
अविश्वासाचं मोहोळ ही उठवू नकोस…
माझ्या भोवती….
बहकतांना तुझ्या भूल थापांना
त्यांनीच तर गर्तेच्या विळख्यातून
सोडवलंय….मला प्रत्येक वेळी…
बहरले जरी आता , रातराणीचा
बेधुंद पणा लेवून…
स्वैर वागण्याची शिक्षा ही
देवू नकोस….
माझं स्ञीत्व जपणं सोपं नाही…
पण अगतिकता ही एवढी नाही….
उन्मळून पडण्या पेक्षा…
घट्ट जमीन धरून…
जगणं शिकलेय मी अनुभवानं…
© लीना राजीव.
सौ. लीना राजीव देशपांडे
Leave a Reply