जगण्याची साधी सोप्पी तत्वे-भाग एकशेसदतीस
आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे-भाग बारा
निरोगी राहाण्यासाठी काय करावे ? -भाग एकतीस
बाबा सांगतात…
देव, गाय, ब्राह्मण, वृद्ध, राजा, आणि अतिथी यांची यथायोग्य पूजा करावी. याचकाला काही न देता घालवू नये, त्यांचा अवमान करू नये आणि कठोर शब्दांनी बोलू नये.
गाय या शब्दाने सर्व गोवंश घ्यावा. पूजा म्हणजे पंचोपचार किंवा षोडशोपचार पूजा नाही. तर त्यांना योग्य तो मान द्यावा. गोवंश हा मानवाच्या आरोग्याची पुरेशी काळजी घेत असतो. केवळ शारीरिक नव्हे तर मानसिक आध्यात्मिक आणि सामाजिक आरोग्य देखील सांभाळत असतो. म्हणून गोवंश संवर्धन झाले पाहिजे. पूर्वीच्या काळी जो गोवंश राखला जात होता, तो हळूहळू कमी होत जातोय. ही धोक्याची घंटा आहे. म्हणून गोवंश संवर्धनाबरोबरच गोवंश रक्षणदेखील करायला हवे. अस्सल भारतीय गो वंश आज भारतातच उपलब्ध नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. फक्त भारतीय गोवंश हा औषधीगुणांनी युक्त आहे. अन्य हायब्रीड पशू हे फक्त गायींसारखे दिसतात, पण औषधी गुणांनी शून्य. उलट अपाय करणारे अनेक रोग वाढवणारे एक विषारी प्रथिन त्यांच्या दुधामधे दिसते. म्हणून हायब्रीड दूध जसे, जर्सी, हाॅस्टन, एच एफ इ. अजिबात वापरू नये.
आयुर्वेदात गाईचे दूध आणि दही औषधी म्हणून सांगितले आहे. ते औषध म्हणूनच वापरावे. पण दह्या दुधाचा आहारात समावेश झाला की ते मधुमेहासारख्या आजारांना वाढवते, हे पण लक्षात ठेवावे. अगदी देशी गाईंचे दूध आवर्जुन पिणाऱ्या आणि पोरांना बळेबळे पाजवणाऱ्या माता पिता पालकांनी हे लक्षात घ्यावे, की दूध हे कष्टाचे काम करणाऱ्या श्रमजीवी वर्गासाठी आहे. खुर्चीत बसून, मान खाली घालून, केवळ बटनांशी चाळा करीत, काम करणाऱ्या काटकोनी बुद्धीजीवींना नाही. आहारात जे अत्यंत आवश्यक आहे,असे ताक, लोणी आणि तूप मात्र आम्ही कटाक्षाने टाळू लागलो आहोत. हा बुद्धीभेद कोण करतंय, या विषयी सविस्तरपणे मागे लिहिले होतेच.
वृद्धांना योग्य तो सन्मान द्यावा. इथेदेखील सर्व जाती धर्माचे वृद्ध असेच अपेक्षित आहे आणि योग्य तो सन्मान करावा हे अनादि कालापासून सांगितले जात आहे, याचे स्मरण करून देतो. पाश्चात्य संस्काराचा परिणाम म्हणून जी मानसिकता बदलत गेली, त्याचा परिणाम म्हणून, वृद्धांचा समावेश असलेली एकत्र कुटुंब व्यवस्था लयाला गेली आणि प्रत्येकाचे छोटेखानी कुटुंब जन्माला आले. ते सुद्धा हम दो हमारा एक. आता तेही नाही. आणि जे वृद्ध आहेत त्यांच्यासाठी स्वतंत्र आश्रम ! भारतीय संस्कृतीला अत्यंत लाजीरवाणे असलेले हे वृद्धाश्रम भारतात झपाट्याने वाढताहेत हे चांगले लक्षण नाही. आता दत्तक वृद्ध घ्यायची नवीन परंपरा सुरू झाली आहे, ही त्यातल्या त्यात समाधानाची बाब.
कृपया या वाक्यातून यातून सोयीस्कर अर्थ काढू नये. जेव्हा हे वृद्धाश्रम बंद होतील आणि पुनः एकत्र कुटुंब व्यवस्था सुरू करण्याची भारतीय मानसिकता निर्माण होईल तो सुदिन !
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
02362-223423.
Leave a Reply