अशाच सुरम्य संध्याकाळी
आत्ममग्नि एकांती निवारा
सृष्टिचा हा अगम्य सोहळा
लोभस दृष्टांत हा साजिरा
निरवतेत इथे हरवुनी जावे
उलगडावा , आत्मगाभारा
सत्य ! जीव जगतो एकटा
या किनारी शाश्वती सहारा
लोचनी आज सांजसावळी
ओघळे अनामिक तारणारा
चराचरी या भास हरिहराचा
जीवाजीवा, सदा सावरणारा
— वि.ग.सातपुते. (भावकवी)
9766544908
रचना क्र. १५२
१८ – ६ – २०२२
Leave a Reply