आयुष्यभर वर्णभेदाविरोधात लढणारे दक्षिण आफ्रिकेचे संघर्ष नायक, नोबल शांती पुरस्कार विजेते आणि आफ्रिकेचे माजी आर्चबिशप डेसमंड टूटू यांचे काल (२६ डिसेंबर २०२१ ) निधन झाले.
डेसमंड टूटू यांचा अल्पपरिचय.
डेसमंड टूटू जन्म ७ ऑक्टोबर १९३१
डेसमंड टूटू यांना दक्षिण आफ्रिकेत रंगभेद विरोधाचं प्रतिक म्हणून ओळखलं जातं. त्यांना देशाची नैतिक कम्पास (Country’s Moral Compass) म्हणूनही ओळखलं जातं. त्यांनी नेहमी विवेकवादाची बाजू घेतली. रंगभेदाविरोधात अहिंसक लढा उभारल्याबद्दल त्यांना 1984मध्ये शांततेचा नोबल पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं होतं.
१९८६ मध्ये केपटाऊनमध्ये ते पहिले आर्चबिशप बनले. आफ्रिकन नॅशनल काँग्रेसच्या सरकारशी चर्चा झाल्यानंतर 1990मध्ये नेल्सन मंडेला यांना तुरुंगातून सोडण्यात आलं. त्यानंतर वर्णभेदाविरोधातील कायदा संपुष्टात आणला गेला.
1994 मध्ये विजयी झाल्यानंतर राष्ट्रपती मंडेला यांनी मोठा निर्णय घेतला. वर्णभेदाच्या काळात मानवाधिकाराचं हनन झालं होतं. त्याची चौकशी करण्यासाठीच्या आयोगाचं नेतृत्व डेसमंड यांच्याकडे सोपवण्यात आलं.
2007मध्ये भारत सरकारने डेसमंड यांना गांधी शांती पुरस्कार देऊन गौरवलं होतं.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply