नवीन लेखन...

ज्येष्ठ हिंदी अभिनेत्री नुतन

मिलन चित्रपटातलं सावन का महिना, सरस्वती चंद्र चित्रपटातलं चंदन सा बदन , कर्मा चित्रपटातलं दिल दिया है जान भी देंगे सुजाता मधलं जलते है जिस के लिये, बंदिनी मधलं मेरे साजन है उस पार आणि दिल ही तो है मधलं तुम अगर मुझको ना चाहो तो कोई बात नही ही नूतनजीची गाणी खूप गाजली. ही गाणी. व त्यातलं नूतन यांचे ते साधं तरीही सुंदर दिसणे.  त्यांचा जन्म ४ जून १९३६ रोजी झाला.
नूतन यांचे शालेय शिक्षण स्वित्झेर्लंडला झाले. नूतन यांनी अभिनयाच्या क्षेत्रात काम करावे हे शोभना समर्थ यांनीच ठरवले होते; म्हणून नूतन जेमतेम १४ वर्षांचीच असतांना त्यांच्या साठी त्यांनी हमारी बेटी या चित्रपटाची निर्मिती केली. हमारी बेटी इतका चालला नाही; पण नूतन नावाची एक नायिका चित्रपटसृष्टीत दाखल झाली आहे, हा संदेश योग्य लोकांपर्यंत गेला. त्यामुळे नूतन यांना नगिना हा रहस्यमय चित्रपट मिळाला. यात तिचा नायक होता नासिरखान. हा चित्रपट फक्त प्रौढांसाठी असल्याने खुद्द नायिका नूतन या १६-१७ वर्षांचीच असल्याने प्रीमियर शो त्यांना बघता आला नव्हता. या नंतर नूतन यांना नायिका म्हणून जिया सरहद्दी यांचा कलात्मक चित्रपट हमलोग मिळाला. बलराज सहानी, अन्वर हुसेन, सज्जन, श्यामा अशा नामवंत कलाकारांच्या यात भूमिका होत्या. रोशन यांचे स्वरेल आणि लोकप्रिय होणारे संगीत होते. टीकाकारांनी वाखाणलेल्या या चित्रपटाला आर्थिक यश मिळाले नाही. नंतर शीशम , लैला मजनू , हीर शबाब असे चित्रपट करत त्यांना १९५५ साली अमिया चक्रवर्ती यांनी त्यांच्या स्वत: दिग्दर्शित केलेल्या सीमा या चित्रपटात नायिकेची भूमिका दिली. या भूमिकेने त्यांना पहिले सर्वोत्कृष्ट अभिनयाचे फिल्म फेयर पारितोषिक मिळवून दिले. बारिश , पेईंग गेस्ट, सोने की चिडिया, अनाडी, सुजाता अशा चित्रपटांत शहीद लतीफ, हृषीकेश मुखर्जी, बिमल रॉय यांसारख्या प्रथम श्रेणीच्या दिग्दर्शकांबरोबर नूतन यांनी काम केले. याच काळात चन्दन , कभी अंधेरा कभी उजाला, आखरी दाव, लाईटहाऊस सारखे सुमार चित्रपटही त्यांनी केले. दिल्ली का ठग या चित्रपटात त्यांनी स्विमिंग कॉच्युम घालून खळबळ उडवून दिली होती. नंतरच्या काळात त्यांनी सुजाता, छाबिली, छलिया, कन्हैया, सूरत और सीरत, बंदिनी, तेरे घरके सामने, दिल ही तो है, खानदान , मिलन , सरस्वती चंद्र असे सुंदर चित्रपट केले. यांतील सुजाता, बंदिनी , मिलन या चित्रपटांनी त्यांना ३ फिल्म फेयर पारितोषिके प्राप्त करून दिली. मिलन नंतर दहा वर्षांनी ती चाळिशीत असतांना तिला परत एकदा नायिकेच्या भूमिकेसाठी मै तुलसी तेरे आंगन की या चित्रपटाने पाचवे फिल्म फेयर पारितोषिक तिच्या पदरात टाकले. त्या वेळेस मीनाकुमारीसह अन्य कुठल्याही नायिकेला अशी आणि इतकी पारितोषिके मिळवता आली नाहीत. नंतरही मेरी जंग या चित्रपटाने तिला सहाय्यक भूमिकेसाठी हे पारितोषिक मिळवून दिले. याच्या जोडीने छलिया आणि अनुराग यांतल्या भूमिकांसाठी तिने नामांकनही प्राप्त केले होते. नूतन त्या लोकप्रियतेच्या ऐन भरात असतांना त्यांनी राज कपूर, देव आनंद आणि अशोककुमार या आघाडीच्या नायकांबरोबर बरेच चित्रपट केले. पण या आघाडीतला चौथा आणि अभिनयाचा बादशहा म्हणून गणल्या गेलेल्या दिलीपकुमारबरोबर तिचा एकही चित्रपट झाला नव्हता. त्या काळात दिलीपकुमारबरोबर काम करण्यासाठी सर्वच नायिका कमालीच्या उत्सुक असत. तसा नूतनचा दिलीपकुमारबरोबर शिकवा चित्रपटाचे शुटींग सुरू झाले होते. पण तो अपूर्णच राहिला होता. अशा काळात के. असीफने तिला मुघले आजम या चित्रपटातील अनारकलीच्या भूमिकेसाठी देकार दिला होता. सलीमच्या भूमिकेत दिलीपकुमार होता. पण नूतनचा मोठेपणा असा की तिने असीफला सांगितले, की अनारकली ही सौंदर्यवती म्हणून प्रसिद्ध होती; त्यामुळे या भूमिकेसाठी मधुबालाशिवाय पर्यायच नाही. नूतन यांनी राज कपूर, देव आनंद, अशोककुमार, बलराज सहानी अशा नामवंतांबरोबर अनेक चित्रपट केले, पण त्याचबरोबर त्यांनी शम्मी कपूर, शेखर, भारत भूषण, धर्मेंद्र, अमिताभ बच्चन, मनीष, अशा त्यावेळेस नाव नसलेल्या नायकांबरोबर बर्याीच सामान्य चित्रपटांतून अनेक भूमिका केल्या. तसेच ती प्रथम श्रेणी नायिका झाल्यावरही शेवटपर्यंत तिने नवोदितांबरोबर चित्रपट स्वीकाण्यास खळखळ केली नाही. संजीव कुमार यांच्या बरोबर तिने देवी, गौरी असे चित्रपट केले. नूतन १९५१ साली मिस इंडिया या किताबाची मानकरी ठरली होत्या. नूतन यांचा सरस्वतीचंद्र हा चित्रपट बराच गाजला होता. या चित्रपटात नूतन यांनी दिलेली पोज तर त्याहूनही अधिक प्रसिद्ध झाली होती. सरस्वतीचंद्र चित्रपटात पलंगावर पहुडलेल्या नूतन यांच्या हातात पत्र आहे अशी पोज होती. गौतम राजाध्यक्षांसारखा एक मोठा फोटोग्राफर नूतन यांना जगातल्या सर्वात सुंदर स्त्रियांपैकी एक समजत असे. कमालीचा फोटोजेनिक चेहरा, सडसडीत अंगकाठी आणि उंच बांधा. सगळे असून नूतन सगळ्या चित्रपट सृष्टीसाठी नूतन ताईच राहिली. १९७४ मध्ये भारत सरकार ने नूतन यांना पद्मश्री पुरस्कार देऊन गौरव केला होता. नूतन यांचे २१ फेब्रुवारी १९९१ रोजी निधन झाले.

संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट / प्रकाश चान्दे

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4354 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..