नवीन लेखन...

पहिली संपत्ती शरीर

श्री गजानन विजय ग्रंथात वाचले आहे की पहिली संपत्ती शरीर. दुसरे ते घरदार. तिसरीचा प्रकार आहे धन मानाचा. आपण ही रोज म्हणतोच की आरोग्यम धनसंपदा. जन्मजात निरोगी पण सगळे अवयव धड चांगले असणे खूपच महत्वाचे आहे. यात नशीब असेल तर हे मिळते. पण त्या शरीराला जपणे. निगा राखणे. नियमित व्यायाम. चौरस आहार आणि बरेच पथ्य पाळले गेले नाही तर ही संपत्ती नाहीशी होते. आणि मग वाटते की लुळी पांगळी श्रीमंती पेक्षा धट्टीकट्टी गरीबी चांगली. आणि आता तर हवा पाणी अन्न हे सगळेच दूषित आहे म्हणून जास्त काळजी घेतली पाहिजे. आजार. साथीचे रोग. अपघात. म्हातारपण यात बरीच शक्ती जाते. त्यामुळे पैसा तर हवाच पण त्याही पेक्षा जास्त माणुसकीचा आधार हवा. पैसा देऊनही जी वागणूक मिळते तेव्हा परावलंबी पणा पेक्षा ती वागणूक सहन होत नाही. त्यामुळे आत्मा तळमळतो.
आता यात बरीच वर्षे झाली तर मग काय खूपच जाणवते. कित्येक वर्षे सतत काम करणे. हिंडणे फिरणे. मनसोक्त खाणे पिणे अशा अनेक गोष्टी आहेत ज्यावर बंधन येतात. पुरुषांची सेवा बाई करते पण हे बाईचे करणे त्याला करणे आवश्यक असले तरी ती खंत व्यक्त करते. आता आपण काहीच करू शकत नाही म्हणून. आणि जेव्हा हीच कामे घरातील किंवा बाहेरची व्यक्ती करतात.तेव्हा घरच्या लोकांनी त्या बाईकडे बारीक लक्ष ठेवून वेळ प्रसंगी जाब विचारला पाहिजे. त्यांना त्रास होतो हे सगळे दिसते. पण नाईलाज असतो म्हणून करणाऱ्या व्यक्तीने हे समजुन घ्यायला हवे की शरीर. पैसा. शक्ती सौंदर्य या गोष्टी कायम राहणार नाहीत. आपण पण यातून जाणार आहोत. त्या वेळी आपल्याला अशी वागणूक मिळाली तर…. आणि ज्या गोष्टी कराव्या लागतात त्या जर रागारागाने करून ती व्यक्ती दुखावत असेल तर काय उपयोग. म्हणून तेच जर थोडीशी माणुसकी. आपुलकी दाखवून केली तर स्वतःला समाधान आणि त्या व्यक्तीचा आशीर्वाद नक्कीच मिळेल.
मान्य आहे की इतर अनेक कामे करुन हे ज्यादाचे आणि जबाबदारीने करावे लागते. याचा त्रास होतो हेही कळते याचे उपकाराखाली दडपण येते आणि सहनही होत नाही अशी परिस्थिती निर्माण होते. पैसा न घेता अशी समाजसेवा करणारे लोक म्हणजेच देवमाणसं. हे सगळ्यांनाच जमत नाही पण माणूस म्हणून तरी केले जावे एवढेच वाटते. हे सगळे करवून घेतले आणि त्याला तरी चांगले वाटते का?? तेव्हा आज सुपात आहोत उद्या जात्यात जाणार आहोत हे लक्षात ठेवून वागले पाहिजे.
— सौ. कुमुद ढवळेकर.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..