काल माझ्या भाच्चीच्या मुलाचे बारसे होते मात्र मी जाऊ शकले नाही पण सून बाई गेल्या होत्या. कार्यक्रमाच्या बद्दल माहिती माहिती सांगताना म्हणाली की पाळणा म्हणण्यासाठी काही बायका आल्या होत्या म्हणजे त्या साठी त्यांना पैसे द्यावे लागतात. मला खूप आश्चर्य वाटलं. आपल्या सर्वांच्या घरी काही प्रसंगी आनंदी वातावरण निर्माण झाले की मानवी स्वभावच असा असतो की अशा वेळी गाणी नाच सहज स्वयंस्फूर्तीने केले जातात. उदा मुहूर्ताची.मंगलाष्टक. मंगळागौर. डोहाळे जेवण. बारसं वगैरे आणि ती गाणी घरातील एखादी बाई किंवा बायका म्हणतात. खर तर मुळातच स्री ला उपजतच गाणे म्हणता येते. आणि आवडही असते. पण पूर्वी हे सगळे स्वतः पुरतेच होते. आताही आवडती गाणी म्हणतात मग अशी गाणी शिकलो तर पैसा वाचेल की. पण वाचविण्यासाठी वेळ नाही पण पैसा आहे की. म्हणून..
काळ बदलला विचार सरणी बदलली. स्वातंत्र्य. सोयी. महत्व. वाढले म्हणून शिकणे शिकवणे ही प्रथा सुरू झाली. आणि एक प्रकारचा व्यवसाय सुरू झाला. गाणी. नाच. खेळ. स्वयंपाक. पोहणे आणि किती किती काय शिकवायचे प्रकार आहेत. जे पूर्वी आपलेपणा. आवड. माणुसकी. कर्तव्य म्हणून शिकवले जायचे. त्या साठी पैसा खर्च करावा लागतो आता. आणि आता हे नवीनच समजले की बारसं होतांना पाळणा म्हणण्यासाठी पैसा दिला की बायका येतात. हे सगळे ठिक आहे व्यवहार म्हणून मात्र यात प्रेम. माया. आपुलकी याची उणीव भरून निघेल का? मला अनुभव आहे आणि पाहिलेले आहे की आपल्या कुटुंबातील एखाद्या अशा प्रसंगी गाणी म्हणताना कंठ दाटून येतो. डोळ्यात पाणी येतं. आतून कुठे तरी काही तरी होतं आणि म्हणूनच असे प्रसंग हृदयस्पर्शी होतात. मनापासून आनंद व समाधान वाटते…
आता काळानुसार आपणही बदलले पाहिजे. आणि पैसा कुठे लागत नाही. जन्माला येण्यासाठी. जगण्यासाठी. मरणानंतरही. थोडक्यात काय तर माणूस झाला छोटा पैसा झाला मोठा.
–सौ. कुमुद ढवळेकर.
Leave a Reply