यात्रा चारीधाम नको, मज हवी पंढरीवारी
देवांचाही देव तिथें विठु , भक्तांचा कैवारी ।।
नेत्र मिटुनही अंत:चक्षू रूप पाहती त्याचें
झोपेमध्येसुद्धां विठ्ठलमूर्ती नयनीं नाचे
अखंड विठ्ठलमहिमा गाती या वाचा चत्वारी ।।
भान हरपलें, पाण हरखले, येतां भीमाकाठा
मान पळे, अभिमान गळाला, उरला नाहीं ताठा
पोचे चिन्मय-आनंदाच्या अक्षय मी कोठारीं ।।
हवी कशाला नश्वर दुनिया, हवी कशाला माया ?
हवी कशाला पळपळ मनिं भयकारी-मृत्यूछाया ?
जन्मांच्या चक्रातुन सुटका मिळते विठ्ठलदारीं ।।
– सुभाष स. नाईक. Subhash S. Naik
सांताक्रुझ (प), मुंबई. Santacruz(W), Mumbai.
Ph-Res-(91)-(22)-26105365. M – (91)-9869002126
eMail : vistainfin@yahoo.co.in
Website : www.subhashsnaik.com / www.snehalatanaik.com
Leave a Reply