१९४७ साली जेव्हा भारताला स्वातंत्र्य प्राप्त झाले तेव्हा ’ऑल इंडिया रेडिओ’ नावाचा स्वतंत्र विभाग माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या अंतर्गत स्थापन करण्यात आला. ’ऑल इंडिया रेडिओ’चे अधिकृतरीत्या ’आकाशवाणी’ हे नाव १९५७ साली ठरविण्यात आले. ते नरेंद्र शर्मा यांनी सुचविले होते. आज जे आपण ‘आकाशवाणी’ नाव ऐकतो ते १९५७ मध्ये नरेंद्र शर्मा यांनी ‘आकाशवाणी’ हे नवे आकर्षक नाव ऑल इंडिया रेडीओला सुचविले. या नावामुळे भारतीय जनता, रसिक श्रोत्यांमध्ये एक आपुलकीची भावना निर्माण झाली, व लोक रेडिओ ऐकू लागले.
जेष्ठ हिंदी कवी, लेखक पं. नरेंद्र शर्मा यांचा जन्म २८ फेब्रुवारी १९१३ रोजी उत्तर प्रदेशतील जहागीरपूर येथे झाला. अलाहाबाद विद्यापीठात अध्यापनशास्त्र आणि इंग्रजी मध्ये एम.ए केले. १९५३ मध्ये नरेंद्र शर्मा यांनी आकाशवाणीत नोकरी सुरु केली.
१९३१ मध्ये पंडित नरेंद्र शर्मा यांची पहीली कविता ‘चांद’ या मासिकात आली होती. विविध भारतीची सुरुवात २ ऑक्टोबर, १९५७ रोजी झाली. १९५७ साली आकाशवाणीचे तेव्हाचे महानिर्देशक गिरिजाकुमार माथुर यांनी एक अशी रेडियो चालू करण्याची कल्पना मांडली की ज्यात विवीधता असावी. त्यामुळे या रेडिओचे नाव विविध भारती पडले. नरेंद्र शर्मा व गोपालदास यांनी त्यांना सहयोग दिले.
विविध भारतीवर पहील्या गाण्याची सुरवात संगीतकार अनिल विश्वास यांनी नरेंद्र शर्मा यांनी लिहिलेल्या गाण्याने झाली. ज्या नरेंद्र शर्मा यांनी ज्योती कलश छलके हे गाणे लिहिले त्याच नरेंद्र शर्मा यांनी सत्यम शिवम सुन्दरम या चित्रपटातील सत्यम शिवम सुन्दरम हे गाणं लिहिले होते. पं. नरेन्द्र शर्मा यांनी लिहिले स्वागतम हे गाणं १९८२ च्या एशियाड मध्ये स्वागत गीत म्हणून निवडलेले होते. याचे संगीत पं. रविशंकर यांनी दिले होते. पं.नरेंद्र शर्मा यांनी लोकमानसात आपले आगळे स्थान निर्माण केले होते. मुंबई टॉकीज आणि देविका राणी युसूफ खान पठाण, (दिलीप कुमार) यांचा ‘ज्वार-भाटा’ चा नायक म्हणून विचार करत होते. तेव्हा नरेंद्र शर्मा यांनी युसूफ खान पठाण हे नाव दिलीप कुमार नाव सुचवले. पं. नरेंद्र शर्मा, यांनी लोकमानसात आपले आगळे स्थान निर्माण केले होते. पंडीत नरेंद्र शर्मा यांना लता मंगेशकर या आपले संगीत गुरू मानत. पंडित नरेंद्र शर्मा यांचे ११ फेब्रुवारी १९८९ रोजी निधन झाले. आपल्या समुहा तर्फे पंडित नरेंद्र शर्मा यांना आदरांजली.
— संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
Leave a Reply