मकर संक्रान्ति साजरी करतांना, आपण १४ जानेवारी १७६१ ला लढल्या गेलेल्या पानिपतच्या तिसर्या लढाईची आठवण विसरूं या नको.
हिंदुस्थान्यांसाठी हिंदुस्थान ( आजच्या भाषेत, ‘भारतीयांसाठी भारत’ ) या तत्वावर ही लढाई लढली गेली.
कुठले नर्मदेच्या दक्षिणेकडले मराठे, आणि ते या तत्वासाठी कुठे उत्तर भारतात जाऊन लढले, त्यांंनी यासाठी आपले प्राणही दिले. ते एकहाती लढले, त्यांना भारतातील कोणीही मदतही केली नाहीं !
मराठे कां हरले याची कारणमीमांसा अनेकांनी केलेली आहे, तुम्ही आम्हीही करूं.
मात्र, हें विसरूंया नको की या लढाईमुळे , ( आणि तिच्या केवळ ३.१/२ वर्षें आधीची प्लासी — पलाशी— ची लढाई, यांच्या एकत्रित परिणामामुळे ) , भारताचा पूर्ण इतिहास बदलून गेला.
पनिपतावरील वीरांना प्रणाम .
– सुभाष स. नाईक.