पाण्याचे व प्रदुषणाचे संकट आज आपल्याला मोठे वाटत नसले, तरी त्याची तीव्रता क्षणोक्षणी वाढत आहे. यासंदर्भातला निष्काळजीपणा मानवजातीच्या विनाशापर्यंत नेऊ शकते.सजीवांच्या अस्तित्वासाठी शुद्ध व निर्मळ पाण्याची गरज आहे. पाण्यात विरघळलेल्या आक्सिजनचे प्रमाण प्रतिलिटर ८ मिलीग्राम पेक्षा कमी झाल्यास पाणी प्रदूषित होते, हेच प्रमाण प्रतिलिटर ४ मिलीग्राम पेक्षा कमी झाल्यास सजीव नष्ट होतात.
गरजेच्या प्रमाणात पाणी दिवसेंदिवस कमी कमी होत आहे.याबाबतचे अमरावती जिल्ह्यातील ‘चारगड’ प्रकरण फार बोलके आहे. पाण्याचे संकट, घातक रसायनांचा भरणा, हरितगृह वायूंचे संकट, हिमपर्वतांचे वितळणे, पृथ्वीच्या तापमानातील वाढ, सजीवांचे नैसर्गिक चक्र नष्ट होणे ह्या सर्व बाबी माणसाची मती गुंग करणाऱ्याच आहेत.
” पाण्यात मिसळले जाणारे घातक रसायने व त्यापासून शरीरावर होणारे अनिष्ट परिणाम ”
घातक पदार्थ शरीरावर परिणाम रसायनांचा उगम
१) आर्सेनिक – कातडी व रक्ताचा कर्करोग – भूगर्भ, कीटकनाशके, रिफायनरी
२) काडमियम – मुत्रसंस्था – भूगर्भ, कागद व ब्याटरी कारखाने, गल्बनाइजनळ
३) तांबे – पचनसंस्था – भूगर्भ, रासायनिक द्रव्य
४) सायनाइड – मज्जसंस्था, थायराइड – प्लास्टिक व धातुंचे कारखाने, खाते, कीटकनाशके
५) फ्लोराइड – हाडे व दात – भूगर्भ, खाते व अल्युमिनियम कारखाने
६) शिसे – लहान मुले,किडनी,रक्तदाब – भूगर्भ,पिण्याच्या पाण्याचे नळ
७) पारा – किडनी – भूगर्भ, कारखाने
८) नायट्रेट – गर्भावर – ड्रेनेजद्वारे, नैसर्गिक
९) सेलेनियम – नखे व हातपाय बधिर होने – रिफायनरी, नैसर्गिक
— नरेंद्र श्रावणजी लोहबरे उर्फ नरेश
Leave a Reply